Cold Weather : दापोलीकरांना थंडीची चाहूल

पाऊस माघारी गेल्यामुळे गेल्या २ दिवसांपासून दापोलीकरांना थंडीची चाहूल लागली आहे. गार वारे वाहू लागल्यामुळे बागायतदारांसह दापोलीतील व्यावसायिकही आनंदित झाले आहेत.
Cold Weather
Cold WeatherAgrowon

दापोली, जि. रत्नागिरी ः पाऊस माघारी (Rainfall) गेल्यामुळे गेल्या २ दिवसांपासून दापोलीकरांना थंडीची चाहूल (Cold Weather) लागली आहे. गार वारे वाहू लागल्यामुळे बागायतदारांसह दापोलीतील व्यावसायिकही आनंदित झाले आहेत. पर्यटन हंगाम (Tourism Season) सुरू होणार असल्याने व्यावसायिकांनीही तयारी केली आहे.

या वर्षी ऑक्टोबर हीट फारशी जाणवली नसली तरी सलग आठ दिवस पडलेल्या पावसाने शेतकरी, बागायतदार हवालदिल झाले होते. या पावसामुळे पर्यटकांनीही दापोलीकडे पाठ फिरवल्याने व्यावसायिकही नाराज झाले होते. दापोलीत ऑक्टोबरपासून पर्यटन हंगामाला सुरुवात होत असल्याने येथील किनाऱ्यावरील व्यावसायिक, मच्छीमारी व्यावसायिकांची लगबग सुरू असते.

Cold Weather
Indian Agriculture : शेती शिक्षणात शेती शोषणाचा इतिहास मांडला जातो का ?

परंतु पावसामुळे आणि रस्त्यांची दुर्दशा असल्याने पर्यटकांनी दापोलीकडे पाठ फिरवली होती. परंतु गेल्या चार दिवसांपासून हवामान स्वच्छ झाले असून, दिवसभर कडकडीत ऊन पडत असून, पहाटे आणि रात्री थंडी पडू लागली आहे. अनेक ठिकाणी धुक्याची चादर पाहवयास मिळत आहे. दापोलीतील किनाऱ्यावर सीगल पक्ष्यांचेही आगमन झाले असल्याने हे पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची पावले दापोलीकडे वळू लागली आहेत.

दापोली तालुक्याचा पारा घसरू लागला आहे. २२ ऑक्टोबरला येथील किमान तापमान २२ अंश सेल्सिअस होते, ते गेल्या सात दिवसांत घटले असून, शुक्रवारी (ता. २८) दापोलीतील पारा १५ अंशांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे सकाळी तालुक्यात धुक्याची चादर पसरली आहे. थंडी पडू लागल्याने पर्यटकांची पावलेही दापोलीकडे वळू लागली आहेत. किनाऱ्यावरील हॉटेल व्यावसायिकांनी या हंगामासाठी सज्जता ठेवली आहे.

Cold Weather
Weather Update : राज्यात गारठा कायम

दापोलीतील किमान

तापमानाची नोंद (अंशांत)

तारीख किमान तापमान

२२ ऑक्टोबर २२.७ अंश

२३ १८.२

२४ १६

२५ १५

२६ १६.१

२७ १६.३

२८ १५.६

गतवर्षीपेक्षा पाऊस कमी

दापोलीचे कमाल तापमान ३२.२, तर किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस असल्याची माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने दिली आहे. मागील वर्षापेक्षा या वर्षी कमी पाऊस पडल्याने पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वर्षी ३५५९.५ मिमी पावसाची नोंद झाली असून गेले काही दिवस मेघगर्जनेसह पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर काही दिवसांपासून हवामान कोरडे असून, गार वारे वाहू लागले आहेत. मागील वर्षी ५४२१.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी दापोलीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com