Cold Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather Update : उत्तर महाराष्ट्र, विदर्भ गारठला

राज्यात थंडी परतल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. शनिवारी (ता. ४) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही थंडी वाढली असून, जळगाव, नागपूर येथे थंडीची लाट आली आहे.

Team Agrowon

Cold Weather Update पुणे : राज्यात थंडी (Cold) परतल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. शनिवारी (ता. ४) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही थंडी (Cold Increased) वाढली असून, जळगाव, नागपूर येथे थंडीची लाट (Cold Wave) आली आहे. आज (ता. ५) राज्याच्या तापमानातील घट कायम राहणार असून, उद्यापासून (ता. ६) तापमानात पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Update) वर्तविली आहे.

शनिवारी (ता. ४) जळगाव येथे राज्यातील नीचांकी ७.७ अंश सेल्सअस तापमानाची नोंद झाली. तर पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने तसेच किमान तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्याने जळगावसह नागपूर येथे थंडीची लाट आली आहे. नागपूर येथे ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले.

तर धुळे, निफाड, मराठवाड्यातील औरंगाबाद येथे तापमानात १० अंशांपर्यंत खाली घसरले आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात घट कायम आहे. कमाल तापमानातही काही अंशी वाढ झाली असून, रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दक्षिण श्रीलंकेतील तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) निवळले असून, श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यालगतच्या कोमोरीन भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी-अधिक होत आहे.

शनिवारी (ता. ४) राजस्थानच्या उमरिया येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता.५) पश्चिम बंगालमध्ये तुरळक ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.४ (१०.३), जळगाव ३२.४ (७.७), धुळे ३०.०(८.०), कोल्हापूर ३०.१ (१८.०), महाबळेश्वर २६.५ (१४.२), नाशिक २९.७ (११.३), निफाड २९.९ (८.२),

सांगली ३०.६ (१५.७), सातारा ३०.९ (१३.५), सोलापूर ३३.६ (१५.४), सांताक्रूझ ३३.५ (१९.७), डहाणू २८.८ (१८.०), रत्नागिरी ३५.६(१९.७), औरंगाबाद ३०.२ (९.१),

नांदेड - (१३.६), परभणी ३१.२(११.५), अकोला ३२.८ (११.०), अमरावती ३२.० (१२.४), बुलढाणा २९.२ (१३.४), ब्रह्मपूरी ३२.४ (१२.३),

चंद्रपूर - (१२.८), गडचिरोली ३०.४(१२.०), गोंदिया ३१.२ (१०.६), नागपूर ३०.७ (९.४), वर्धा ३०.८(१२.०), वाशीम ३२.० (१२.६), यवतमाळ २९.७ (१०.७).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shet raste GR : शेतकऱ्यांच्या शेत, शिव व पाणंद रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक; वाद टळणार? 

Farming Future: शाश्‍वत शेतीकडे शेतकऱ्यांचा कल

Northeast Rainfall : वायव्येकडील राज्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस

US Tariff Attack : अमेरिकेच्या व्यापार हल्ल्याला उत्तर काय?

Women In Farming : कोरडवाहू शेतीत महिलांचे स्थान काय?

SCROLL FOR NEXT