Pune News : राज्यात गेल्या काही दिवसात असलेले पावसाळी, ढगाळ वातावरण (Cloudy Weather) निवळताच थंडी परतली आहे.
शुक्रवारी (ता. ३) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तापमानाचा (Temperature) पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे.
आज (ता. ४) राज्याच्या किमान तापमानातील (Minimum Temperature) घट कायम राहण्याची शक्यता असून, पूर्व विदर्भात गारठा (Cold Weather) आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.
जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात राज्यात पावसाला पोषक हवामान झाले. अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर राज्याच्या अनेक भागात धुक्याचे साम्राज्य पसरले.
ही परिस्थिती निवळताच राज्यात थंडी पुन्हा वाढू लागली आहे. शुक्रवारी (ता. ३) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तर निफाड, मराठवाड्यातील औरंगाबाद, विदर्भातील नागपूर, यवतमाळ येथे तापमानात १० अंशांपर्यंत खाली घसरले आहे.
राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात घट झाली आहे. कमाल तापमानातही काही अंशी वाढ झाली असून, रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
दक्षिण श्रीलंकेतील तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) पश्चिमेकडे सरकून कोमोरिन आणि मनारच्या आखातकडे सरकताच निवळू लागले आहे. श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.
नैर्ऋत्य दिशेकडे सरकणारी ही प्रणाली विरून जाणार आहे. दरम्यान तामिळनाडू, केरळसह पदुच्चेरीत विजांसह पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी-अधिक होत आहे.
शुक्रवारी (ता. ३) राजस्थानच्या चूरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३०.१ (११.५), जळगाव २९.६ (११.८), धुळे २९.०(८.०), कोल्हापूर २९.६ (१७.८), महाबळेश्वर २४.८ (१३.५), नाशिक २८.३ (१२.२), निफाड २८.० (९.६), सांगली ३१.० (१५.८), सातारा ३०.१ (१३.८),
सोलापूर ३२.८ (१५.४), सांताक्रूझ ३४.८ (२०.४), डहाणू ३२.३ (१८.१), रत्नागिरी ३५.६(२१.८), औरंगाबाद २९.४ (९.६), नांदेड ३१.२ (१३.३), परभणी ३०.५(११.३), अकोला ३२.० (१०.६),
अमरावती ३१.२ (१०.५), बुलढाणा २७.२ (१२.८), ब्रह्मपूरी ३१.३ (१२.४), चंद्रपूर २९.४ (११.४), गडचिरोली ३०.४(१२.४), गोंदिया २८.८ (१०.८), नागपूर ३०.० (९.६), वर्धा ३०.८(११.२), वाशीम - (१४.६), यवतमाळ ३०.० (१०.०).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.