Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा चटका

राज्यात थंडीची चाहूल लागली असली तरी अद्यापही थंडीचा कडाका वाढलेला नाही. मात्र पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका ही स्थिती टिकून आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्यात थंडीची चाहूल (Winter Update) लागली असली तरी अद्यापही थंडीचा कडाका (Cold Weather) वाढलेला नाही. मात्र पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाचा (Heat) चटका ही स्थिती टिकून आहे. शनिवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धुळे येथील कृषी महाविद्यालयात ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पहाटेच्या वेळी गारठ्यासह राज्याच्या काही भागांत धुके आणि दव पडणे सुरूच आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या खाली घसरला आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान १३ ते २० अंशांच्या दरम्यान आहे.

यातच दिवसभराच्या कमाल, किमान तापमानात ११ ते २० अंशांची तफावत दिसून येत आहे. किमान तापमान ११ ते २२ अंशांच्या दरम्यान, तर कमाल तापमान ३० ते ३६ अंशांच्या आसपास आहे. आज (ता. १३) राज्यात हवामान कोरडे राहून, तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्र ओसरतेय

बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र तमिळनाडू आणि पदुच्चेरीच्या किनाऱ्यावर येताच त्याची तीव्रता ओसरली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र अंतर्गत तमिळनाडू, केरळकडे सरकत आहे. उद्या (ता.१४) ही प्रणाली अरबी समुद्राकडे जाण्याचे संकेत आहेत. आग्नेय बंगालच्या उपसागरात १६ नोव्हेंबरपर्यंत नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे.

शनिवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.७ (१३.४), नगर ३१.४ (१५.४), जळगाव ३३.२ (१६.४), धुळे ३१.५ (११.५), कोल्हापूर ३१.५ (१८.०), महाबळेश्वर २४.१(१३.९), नाशिक २९.३ (१३.९), निफाड ३०.८ (१२.१), सांगली ३१.८(१७.८), सातारा ३०.०(१६.८), सोलापूर ३३.७ (१६.४), सांताक्रूझ ३४.६(२२.२), डहाणू ३३.१ (२०.३),

रत्नागिरी ३५.४ (२०.७), औरंगाबाद ३०.४ (१४.२), नांदेड ३२.२ (१७.४), उस्मानाबाद ३१.० (१६.५), परभणी ३०.१ (१६.५), अकोला ३३.३ (१८.०), अमरावती ३३.० (१७.३), बुलडाणा ३०.२ (१७.०), ब्रह्मपुरी ३२.७ (१७.१), चंद्रपूर ३०.८ (१८.०), गडचिरोली ३१.८(१६.०), गोंदिया ३०.५(१७.०), नागपूर ३१.९ (१७.१), वर्धा ३१.५(१८.२), वाशीम ३२.८ (१७.२), यवतमाळ ३२.५ (१६.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department Action: अप्रमाणित निविष्ठांप्रकरणी तीन महिन्यांत ९४ गुन्हे

Farmer Crisis: नाशिक विभागात पाच महिन्यांत ११९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Crop Insurance Scheme: पीकविमा कंपन्यांना ६९४४ कोटींचा नफा

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात वाळव्यातून १२७६ शेतकऱ्यांच्या हरकती

Paddy Sowing: भोरमध्ये भात पेरणीला वेग

SCROLL FOR NEXT