नगर ः शिस्त, काटकसर व पारदर्शकता या त्रिसूत्रीवर आधारलेल्या सहकाराचे दिशादर्शक ठरणारे मॉडेल दिवंगत स्वातंत्र्यसेनानी, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी उभारल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे गटनेते आमदार डॉ. सुधीर तांबे (Mla Dr sudhir Tambe) यांनी काढले.
अमृत उद्योग समूहाच्या वतीने कारखाना परिसरातील प्रेरणास्थळावर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन केले. यावेळी डॉ. तांबे बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळात सर्वसामान्यांच्या हिताचा सहकाराचा मार्ग निवडताना त्यांनी स्वच्छ कारभाराची आदर्श तत्त्वे रुजवली. त्यातून फुललेला सहकाराचा वटवृक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अधिकच बहरला, देशासाठी दिशादर्शक ठरला आहे.
सहकारावर आधारलेल्या विविध संस्थांची उभारणी करून, गोरगरिबांच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा पाया भक्कम केला. वयाच्या ८४ व्या वर्षी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाची मोठी लोकचळवळ सुरू करून दुष्काळी तालुक्याचे रूपांतर प्रगतिशील तालुक्यात केले.
यावेळी बाजीराव खेमनर, दुर्गा तांबे, सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, संतोष हासे, संपतराव डोंगरे, सीताराम राऊत, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. सुजित खिलारी आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.