Jammu Kashmir Election : जम्मू-काश्‍मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे

गेल्या साडेतीन वर्षांपासून राष्ट्रपती राजवट असलेल्या जम्मू आणि काश्‍मीर येथे नव्या वर्षात विधानसभा निवडणुका होण्याची चिन्हे आहेत.
Jammu Kashmir Election
Jammu Kashmir ElectionAgrowon

श्रीनगर : गेल्या साडेतीन वर्षांपासून राष्ट्रपती राजवट (President's Rule) असलेल्या जम्मू आणि काश्‍मीर (jammu Kashmir Rule) येथे नव्या वर्षात विधानसभा निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. यादृष्टीने भारतीय जनता पक्षाने (BJP) राजकीय हालचालीला वेग दिला असून वरिष्ठ पातळीवरच्या बैठकांचे आयोजन केले जात आहे.

काल पार पडलेल्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जनतेचा विश्‍वास मिळवण्यासाठी कामाला लागावे, विधानसभेसाठी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तयारीनिशी उतरावे, असे आवाहन केले. भाजपचे सरचिटणीस (संघटना) बी.एल. संतोष आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रभारी तरुण चौघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यात संघटनात्मक चळवळींना वेग देण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी जबाबदारी घ्यावी, असे सांगितले.

Jammu Kashmir Election
Grampanchyat Election : उपसरपंचपदाचा मुहूर्त निघाला

जम्मू काश्‍मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना, राज्य सरचिटणीस अशोक कौल, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, खासदार जुगल किशोर शर्मा यांच्यासह अन्य नेत्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. बैठकीला राज्यातील विविध जिल्हा पातळीवरचे पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी बी.एल. संतोष यांनी बोलताना विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बूथ सशक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत आणि सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

Jammu Kashmir Election
Gram Panchayat Election : सरपंचांना दोन मतांचा अधिकार अबाधित

जबाबदारी सोपविलेल्या भागांत निवडणूक जिंकण्यासाठी प्रभारींनी लक्ष केंद्रीत करावे. तसेच दौरे सुरू करावेत, असेही सांगितले. या बैठकीत काश्‍मीरमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीबरोबरच राजौरीतील डांगरी येथील हिंदु कुटुंबीयांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा झाली.

या बैठकीत संघटनात्मक बांधणी करण्यासाठी राज्यात राबविलेले उपक्रम आणि आगामी काळात काश्‍मीरी जनतेचा विश्‍वास मिळवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या स्वरुपावर चर्चा करण्यात आली.

जनजागरण मोहिम राबविणार

जम्मू काश्‍मीरमध्ये स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून व्यापक प्रमाणात जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनेतून झालेल्या बदलांची माहिती जनतेपर्यंत पोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व जागा जिंकण्यासाठी लोकांची मने जिंकणे आवश्‍यक आहे, असेही नेत्यांनी सांगितले.

जम्मू काश्‍मीरचे प्रभारी तरुण चौघ म्हणाले, की जिल्ह्याच्या प्रभारी आणि ज्येष्ठ नेत्यांनी लोकांत जावून विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीची पाश्‍र्वभूमी तयार करायला हवी. सर्वांनी जबाबदारी गांभीर्याने पार पाडण्याची गरज आहे. सर्वांना मेहनत घ्यावी लागणार असून कार्यकर्त्यांनी केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोचवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

काश्‍मीर खोऱ्यातील कलम ३७० वगळल्यानंतर जम्मू काश्‍मीरच्या जनतेला अधिकार मिळाले. प्रत्येक समुदायाला न्याय मिळत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या या यशाबरोबरच विकास कामापासून मिळणाऱ्या लाभांची माहिती लोकापर्यंत पोचवावी.

जितेंद्र सिंह, केंद्रीय मंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com