Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Seed Black Market : वाढीव दराने बियाणे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करा ; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Seed Market Update : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच कपाशी बियाण्याची विक्री वाढीव दराने होत असल्याचे समोर आले आहे.

Team Agrowon

Eknath Shinde : राज्यात सध्या खरिप हंगामातील शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. मात्र, बियाण्यासांठी विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक सुरू आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच कपाशी बियाण्याची विक्री वाढीव दराने होत असल्याचे समोर आले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (ता. १३) झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. वाढीव दराने बियाण्यांची विक्री करणाऱ्या बोगस विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्य सचिवांना दिले आहेत.

एकीकडे शेतकऱ्यांची खरिप हंगामाची लगबग सुरू असतानाचा दुसरीकडे मात्र बियाण्यांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे. बियाणे विक्रेत्यांकडून अवास्तव किमतीने शेतकऱ्यांना बियाणे विक्री केले जात आहे.

त्यामुळे ऐन खरिप हंगामात बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे समोर आहे. बियाणे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना वाढीव दराने बियाणे विक्री केली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान या प्रकरणाचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसदर्भात चर्चा करण्यात आली. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात पथके तयार करून छापे टाकण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच जे बियाणे विक्रेते योग्य बियाणे योग्य दरात विकत आहेत की नाही हे तपासून बोगस विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई

राज्यात खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांचा काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना अव्वाच्यासव्वा पैसे मोजावे लागत आहेत. दरम्यान, बियाण्यांचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

दरम्यान, आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. ज्यामध्ये सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला. यासाठी एक हजार ५०० कोटींच्या निधीला मान्यताही देण्यात आली. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT