ताज्या बातम्या

Rain Update : नैताळे परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

दुपारी साडे तीन वाजेनंतर दोन तास वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. जवळपास १२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : जिल्ह्याच्या पूर्व भागात औरंगाबाद महामार्गावरील (Aurangabad Highway) नैताळे (ता. निफाड) परिसरात शनिवारी (ता. १) दुपारी साडे तीन वाजेनंतर दोन तास वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश्य पाऊस (Cloudburst-rain) झाला. जवळपास १२५ मिमी पावसाची (Rainfall) नोंद झाली आहे.

२० वर्षानंतर पहिल्यांदाच इतका विक्रमी पाऊस झाल्याने हाहाकार उडला. शेतातील घरांमध्ये पाणी जाण्याची ही पहिली वेळ आहे. त्यामुळे संपूर्ण गाव व परिसरात जनजीवन विस्कळित होऊन मोठी हानी झाली आहे.

दुपारनंतर सुरू झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे ओढे नाले एक झाल्याने पाण्याचा प्रवाह वाहत होता. शेतशिवारासह गावात पूरपाणी शिरले होते. त्यामुळे सोंगणीस आलेली सोयाबिन पिके वाहून गेली. द्राक्ष बागा, भाजीपाला लागवडी क्षेत्राला तलावाचे स्वरूप आले होते.

परिणामी नुकसान होऊन हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी पिकांचे नुकसान मोठे आहे. तर भाजीपाला पिकात टोमॅटोचे नुकसान वाढते आहे.

यासह द्राक्ष छाटणी झालेल्या बागांना मोठा फटका बसलेला आहे.काही ठिकाणी बारीक गार पडल्याने टोमॅटो फळांना मार बसल्याने नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Buldhana Name Change Demand: बुलडाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करा : आमदार श्वेता महाले

Farmers Study Tour: शेतकऱ्यांना युरोप, चीनमधील आधुनिक शेती अनुभवता येणार

Agrowon Podcast: हरभरा आवक कायम, कांद्याच्या भावात वाढ, मेथी बाजारात चढ-उतार, शेवगा दरात बदल तर पपईच्या दरात वाढ

Maharashtra Protest Cases: राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या कालावधीत वाढ, शासन निर्णय जारी

Agricultural Training: कृषी विस्तारकार्याला अधिक गतिमान करा : डॉ. इंद्र मणी

SCROLL FOR NEXT