Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : वातावरण बदलाचा बागायतदारांना फटका

अवकाळी पडलेला पाऊस, त्यानंतर वाढलेले तापमान याचा विपरीत परिणाम आंब्यावर झाला आहे.

Team Agrowon

Weather Update News अलिबाग : अवकाळी पडलेला पाऊस (Unseasonal Rain), त्यानंतर वाढलेले तापमान याचा विपरीत परिणाम आंब्यावर (Mango) झाला आहे.

गेल्या पंधरा दिवसांत वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे रायगड जिल्ह्यात फळधारणेपूर्वीच मोहर गळू लागला आहे.

त्यामुळे २५० हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाला फटका (Mango Crop Damage) बसण्याची शक्यता असल्याने बागायतदार धास्तावले आहेत.

रायगड जिल्ह्यातील ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली जाते. यापैकी १४ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे.

यातून दरवर्षी जवळपास २१ हजार ४२४ मेट्रीक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. यंदा मुबलक पाऊस आणि थंडी पडल्याने आंबा पीक चांगले येईल, अशी अपेक्षा बागायतदारांना होती.

परंतु, अवकाळी पाऊस, तापमान वाढीमुळे फळ गळतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रोहा, मुरूड, श्रीवर्धन, तळा तालुक्यात सर्वात जास्त नुकसान झाले असून आंबा उत्पादनात मोठी घट होईल, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

अवकाळी पाऊस आणि त्यानंतर वाढलेल्या तापमानामुळे उशिराने आलेला मोहर गळून पडण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात बदलत्या हवामानाचा २५० हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकावर परिणाम होऊ शकतो. नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी तलाठी किंवा कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

- डी. एस. काळभोर, कृषी उपसंचालक, रायगड

पावसापेक्षा उष्णतेचा मोठा फटका पिकावर झाला आहे. या उष्णतेमुळे नव्याने आलेला मोहर तग धरू शकला नाही. फळधारणा होत असतानाच हे संकट ओढावले असल्याने अर्ध्याहून अधिक पीक वाया जाणार आहे.

- सदानंद पाटील, आंबा बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Protest: सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन; मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित

Agriculture Policy Controversy: केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांवर अनुदान मंजुरीवरून आरोप; भाजपने आरोप फेटाळले

Crop Insurance Data Discrepancy: पीकविमा नफ्याच्या आकडेवारीत विसंगती

Russia Fuel Shortage: युक्रेन युद्धामुळे रशियात इंधनटंचाई

Illegal Money Lending Act: अवैध सावकारीला आळा घालू; सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची कायद्यात बदल करण्याची घोषणा

SCROLL FOR NEXT