APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election : बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

निवडणुकीसाठी पात्र असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका ३० एप्रिलपूर्वी किंवा तोपर्यंत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला दिले आहेत.

Team Agrowon

मानोरा, जि. वाशीम : निवडणुकीसाठी पात्र असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका (APMC Election) ३० एप्रिलपूर्वी किंवा तोपर्यंत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यासह मानोरा बाजार समितीचा (Manora APMC) मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या नवीन सदस्याचा समावेश होण्यासोबतच शेतकऱ्यांना निवडणुकीत सहभागी होता येणार आहे.

कोरोना संक्रमणामुळे बाजार समितीच्या निवडणुका दोन वर्षांनंतर होत आहेत. राज्य सरकार निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार २९ जानेवारीला या निवडणुका प्रस्तावित आहेत. परंतु निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीत ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्थांच्या जुन्याच सदस्याचा मतदार म्हणून समावेश होता.

आता न्यायालयाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा समावेश करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे मतदार यादी नव्याने तयार होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना निवडणुकीत सहभागी होता यावे, यासाठी नियमात बदल करावा लागणार आहे. त्यासाठी ७० दिवस लागतील असे शासनाचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले असून ३० एप्रिलपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून या मुदतीत निवडणुका घेण्यास सांगितले आहे.

न्यायालयाने ज्या बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त आहेत, ते पुढे कायम ठेवण्यास किंवा बदल करण्याची मुभा शासनास दिली आहे. प्राधिकरणाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका गत महिन्यात पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे नवीन मतदाराची नावे मतदार यादीत समाविष्ट करावी लागणार आहेत.

नव्याने मतदार यादी तयार करावी लागणार असल्याने त्यासाठी लागणाऱ्या कालावधीमुळे निवडणुका निर्धारित वेळेत न होता लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT