Zilla Parishad Agrowon
ताज्या बातम्या

ZP Recruitment : जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा

राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील वर्ग तीनमधील सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Team Agrowon

पुणे : राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) वर्ग तीनमधील सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पदभरतीसाठी ग्राम विकास विभागाने (Department OF Rural Development) संभाव्य परिक्षेचे वेळापत्रकही प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत गट ‘क’ मधील सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या पदभरतीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला.

राज्याच्या ग्रामविकास खात्याने या बाबतचा शासन निर्णय मंगळवारी प्रसिद्ध केला आहे. वाहनचालक व गट ‘ड’ संवर्गातील पदे सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्क्यांपर्यंत रिक्त पदे भरण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली होती. त्यांनतर त्याचा पुढचा भाग म्हणजे आता संभाव्य वेळापत्रक परिपत्रक प्रसिद्ध करून रिक्त पदे लवकरच भरले जाणार आहेत.

जिल्हा परिषदांमधील गट ‘क’ मधील सर्व संवर्गाची रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत सुधारित कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार रिक्त पदाची बिंदू नामावली ३१ जानेवारीपर्यंत अंतिम करणे आवश्यक आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर त्यापुढील १५ दिवसांत अर्ज मागविण्यात येतील.

अर्जाची छाननी व पात्र उमेदवारांची यादी मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल. पदभरतीसाठी परीक्षा १४ ते ३० एप्रिल या दरम्यान होईल.मे महिन्यात अंतिम निकाल जाहीर करून पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात येतील, असे ग्राम विकास विभागाने नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Winter Weather: राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची कापूस खरेदी साडेचार लाख क्विंटलवर

Sugarcane Crushing Season: ऊस गाळपात यंदा ६६.४ टक्क्यांनी वाढ

Ahilyanagar Nagarapalika Result: नगर परिषद निवडणुकीत महायुतीची दणदणीत सरशी

Nagarapalika Result: नाशिकमध्ये शिवसेनेचा सर्वाधिक ५ जागांवर झेंडा

SCROLL FOR NEXT