hasan mushrif agrowon
ताज्या बातम्या

Ichalkaranji Water Scheme : 'हसन मुश्रीफांना रक्तपात घडवायचा आहे का'?

Ichalkaranji : जनभावनांचा उद्रेक करून दंगली घडवायच्या आहेत का, असा सवाल ‘मी इचलकरंजीकर’ या बॅनरखाली एकवटलेल्या इचलकरंजीकरांच्यावतीने करण्यात आला.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराला स्वच्छ पाणी मिळण्यासाठी मजरेवाडीची योजनेचे काम सुरू झाले आहे. असे असताना सुळकूड येथून पाणी घेण्याचा अट्टाहास का? आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबतची माहिती देणार आहोत.

इचलकरंजीला सुळकूडमधून नाही, तर मजरेवाडी योजनेतूनच पाणी द्या; अन्यथा रक्तपात होईल, अशी भूमिका मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि माजी आमदार के. पी. पाटील यांनी मांडली. दरम्यान यावर इचलकरंजीकरांनीही संतप्त प्रतिक्रीया दिली आहे.

सुळकूड पाणी योजनेवरून मंत्री हसन मुश्रीफ आणि के. पी. पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांना सत्तेच्या राजकारणासाठी रक्तपात घडवायचा आहे का?, जनभावनांचा उद्रेक करून दंगली घडवायच्या आहेत का, असा सवाल ‘मी इचलकरंजीकर’ या बॅनरखाली एकवटलेल्या इचलकरंजीकरांच्यावतीने करण्यात आला.

त्यांच्या वक्तव्याचा निषेधही यावेळी करण्यात आला. मंत्री मुश्रीफ व के. पी. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी मंगळवार, दि. २९ रोजी पोलिस प्रशासनाकडे मागणी करण्याचा आणि ३१ ऑगस्ट रोजी संयुक्त मेळावा घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

'या' तालुक्यांचा इचलकरंजी पाणी योजनेला विरोध

शासकीय विश्रामगृहात झालेल्या दूधगंगा बचाव कृती समितीच्या बैठकीत हसन मुश्रीफ बोलत होते. इचलकरंजीला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी सुळकूड येथील दूधगंगा नदीतून पाणी नेण्याची योजना आखण्याची मागणी करण्यात आली आहे. याला राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर, शिरोळ आणि निपाणी या तालुक्यांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भातील दूधगंगा बचाव कृती समितीची बैठक झाली.

इचलकरंजी शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत दूधगंगा नदीतून सुळकुड गावाजवळून पाणी नेण्याची योजना मंजूर झाली. कागलमधील लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यानंतर इचलकरंजी विरुद्ध कागल असा वाद पेटताना दिसत आहे. आज दूधगंगा बचाव कृती समितीची सर्वपक्षीय बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत इचलकरंजीला सुळकुड योजनेतून पाणी न देण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT