Ichalkaranji Water Scheme : कोल्हापूरातील कागल तालुका आणि इचलकरंजी वाद पेटणार? पाणी योजनेस सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध

Kolhapur Ichalkaranji : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराला सुळकुड येथून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Ichalkaranji Water Scheme
Ichalkaranji Water Schemeagrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराला सुळकुड येथून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या योजनेला सुळकुडसह काही गावकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. दरम्यान यात आता कागल तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग घेतला आहे.

आज कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सुळकुड योजनेला मंत्री हसन मुश्रीफ, भाजप नेते समरजीतसिंह घाटगे यांच्यासह अन्य नेत्यांनी जोरदार विरोध केला.

कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कागल मधील आमदार, खासदार, मंत्र्यांसह सर्व नेत्यांनी एकमुखाने विरोध केला. यावेळी झालेल्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीकरांनी कागलला पाणी नेण्यासाठी येण्याचे धाडस करू नये. सुळकुड पाणी योजना ही त्यांच्यासाठी काळा दगडावरची रेष ठरली आहे. अशा शब्दात विरोध केला.

इचलकरंजी येथील सुळकुड ही योजना रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक घेवू, ही योजना रद्द करण्या संदर्भात आदेश काढावे लागतील. त्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सर्वजण प्रयत्न करू असेही मुश्रीफ म्हणाले.

पाऊस लांबल्यावर उसाला पाणी मिळाले नाही. ऊस उत्पनात घट झाली असल्याचे पुरावे आहेत. योजनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे इचलकरंजीकरांनी सुळकूडमधून पाणी नेण्याऐवजी वारणा आणि कृष्णा नदींचा पर्यायी विचार करावा,असा सल्ला मंत्री मुश्रीफ यांनी दिला.

Ichalkaranji Water Scheme
Hasan Mushrif : मुश्रीफांच्या बंडामुळे गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समित्यांचा राजकीय पॅटर्न बदलणार?

या बैठकीस, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार के पी पाटील, माजी आमदार संजय घाटगे, यांनीही या योजनेस तीव्र विरोध केला.

तर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सुळकुड नळ पाणी योजनेचे प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झाले नाही, असा उल्लेख करून याबाबत शासनाकडून मार्गदर्शन घेऊन काम केले जाईल असे स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com