Sugarcane Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane FRP: छत्रपती’चा अंतिम ऊस दर २५०० रुपये प्रतिटन

दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर पैसे जमा होणार

टीम ॲग्रोवन

ता. इंदापूर : ‘‘श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने (Shree Chatrapati Co-operative Sugar Mill) २०२१-२२ या गळीत हंगामातील उसाचा अंतिम (Sugar Season) दर २ हजार ५०० रुपये प्रतिटन जाहीर केला आहे. दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर उर्वरित पैसे जमा होतील.

तसेच २०२२-२३ चा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांमध्येच सभासदांच्या संपूर्ण आडसाली उसाचे गाळप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे,’’ अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.

कारखान्याची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता.२९) झाली. कोरोनानंतर पहिल्यांदाच जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. काटे म्हणाले, ‘‘चालू वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे ऊस उत्पादनात वाढ होईल.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ३१ हजार २३८ एकर ऊस गळितासाठी उपलब्ध आहे. ११ लाख मेट्रिक टन सभासदांचे व गेटकेनेचे ३ लाख मेट्रिक टन असा १४ लाख मेट्रिक टनाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी गळीत हंगाम लांबल्यामुळे सभासदांना त्रास सहन करावा लागला.

मात्र चालू वर्षी १५ ऑक्टोबर रोजी गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांत सभासदांच्या सर्व आडसाली उसाचे गाळप संचालक मंडळ पूर्ण करेल. कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगामामध्ये १२ लाख ५१ हजार ७९५ मेट्रिक टनांचे गाळप पूर्ण केले आहे.’’

कारखान्याची एफआरपी २ हजार ४९३ रुपये आहे. यातील २ हजार ४०० रुपये प्रतिटन सभासदांना पैसे दिले आहेत. उर्वरित पैसे दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, अविनाश घोलप, बाळासाहेब घोलप, संचालक अॅड. रणजित निंबाळकर, बाळासाहेब पाटील, सर्जेराव जामदार आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT