Sand Agrowon
ताज्या बातम्या

Sand Policy : सहा महिन्यांनंतरही मिळेना स्वस्तातील वाळू

Maharashtra Sand Policy : वाळूच्या उद्योगात रस असलेल्या व राजकीय वरदहस्त असलेल्या नेत्यांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व बार्शी तालक्यातील अनेक राजकीय नेत्यांचे वाळू तस्करांशी थेट हितसंबंध आहेत.

Team Agrowon

Solapur News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नवे वाळू धोरण जाहीर करून सहा महिने उलटून गेले तरही, अद्याप सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तातील वाळू मिळत नाही. कारण राजकीय नेत्यांचे हितसंबंध वाळूमध्ये इतके गुंतले आहेत की, वाळू ही राजकारणात येणाचे प्रवेशद्वार ठरत आहे.

वाळूच्या उद्योगात रस असलेल्या व राजकीय वरदहस्त असलेल्या नेत्यांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व बार्शी तालक्यातील अनेक राजकीय नेत्यांचे वाळू तस्करांशी थेट हितसंबंध आहेत.

यामुळे सध्या सहा ठिकाणी वाळू उत्खननास परवानगी असूनही केवळ दोनच ठिकाणी वाळू उपसा सुरू आहे. उचेठाण येथील शेतकऱ्यांनी रस्ता देण्यास नकार दिला आहे. यामुळे फक्त चळे आणि जांबोटी या दोनच ठिकाणी वाळू उपसा सुरू आहे. ३ सप्टेंबरपासून सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत अशा दोन तासातच वाळू बुकिंग सुरू ठेवण्यात आले आहे.

तस्करांकडूनच वाळूचे बुकिंग

सध्या जिल्ह्यात दोनच ठिकाणी वाळू उपसा सुरू आहे. याठिकाणी सहाशे रुपये प्रति ब्रास या दराने वाळू मिळते. वाळू डेपोपासून घरापर्यंतचा वाहतूक खर्च नागरिकांनी करायचा आहे. मात्र यासाठी ऑनलाइन बुकिंगची अट आहे. वाळू डेपो परिसरातील अनेकांनी रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रमाणे वाळू बुकिंगचा सपाटा सुरू केला आहे.

यामुळे सामान्य नागरिकांना ऑनलाइन बुकिंगच करता येत नाही. ठराविक वाळू तस्करच बुकिंग करून वाळू उचलत यावर तोडगा म्हणून आता जिल्हा प्रशासनाने ऑनलाइन प्रणाली नेमक्या कोणत्यावेळी खुली करण्यात येणार आहे. याची वेळ जाहीर केली असून सकाळी १० ते १२ ही वेळ बुकिंगसाठी देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rohit Pawar: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्यावे: रोहित पवार

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ३ लाख ५२ हजार हेक्टरला तडाखा

Rural Development : सुंदर गाव योजनेमध्ये कुरगावने मारली बाजी

Rasta Roko Protest : वडखळ-अलिबाग राज्यमार्ग दीड तास ठप्प

India Trade Policy: टॅरिफ बनले शस्त्र, पण भारत कोणाच्याही दबावाखाली झुकणार नाही, अन्न सुरक्षेबाबत कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

SCROLL FOR NEXT