मुंबई : राज्यातील १२२ कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये (Cotton Producer Taluka's) चंद्रपूर तालुक्याची भर पडली आहे. राज्यात १२३ कापूस उपत्पादक (Cotton Producer) तालुके जाहीर करण्यात आले आहेत. मागील दोन वर्षांत चंद्रपूर तालुक्यात सरासरी उत्पादन (Cotton Production) सात हजार ९८२ टन ७३ किलो झाले आहे. त्यामुळे खास बाब म्हणून या तालुक्याला कापूस उत्पादक तालुका घोषित करण्यात आला.
ऑगस्ट २०१८मध्ये राज्यातील ११८ कापूस उत्पादक तालुके घोषित करण्यात आले. त्यानंतर २०१९मध्ये तीन आणि सप्टेंबर २०२० मध्ये एका तालुक्याचा समावेश करण्यात आला. राज्यातील ज्या तालुक्यांत कापसाचे ९६०० टनांहून अधिक उत्पादन सलग दोन वर्षे असेल अशा तालुक्यांचा कापूस उत्पादक तालुक्यांत समावेश करण्याचा निर्णय २०१८ मध्ये राज्य सरकारने घेतला होता.
मात्र चंद्रपूर तालुक्यातील कापसाचे २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांत सरकारी उत्पादन ७९८२ टन ७३ किलो झाले आहे. तरीही खास बाब म्हणून या तालुक्याला कापूस उत्पादक तालुका म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील कापूस उत्पादक तालुक्यांची संख्या १२३ झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.