Central Electricity Department agrowon
ताज्या बातम्या

Central Electricity Department : सर्वच स्तरातून शेती धोक्यात? पाणी सकंटाबरोबर आता वीज संकट, केंद्राकडून राज्यांना सूचना

Central Energy Ministry : केंद्रीय ऊर्जा खात्याने सर्व राज्यांना वीज जपून वापरा आणि वीजनिर्मितीसाठी उपाययोजना करा, अशा सूचना केल्या आहेत.

sandeep Shirguppe

Central Government : महाराष्ट्रातच नाहीतर देशभरात क्षमतेपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणीसंकट देशावर येण्याची शक्यता आहे. दरम्यान पाणी टंचाईमुळे वीज निर्मीतीवरही मोठा परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. देशभरातील अनेक धरणे कोरडी असल्याने भविष्यात वीज टंचाईची समस्या उद्भवू शकते. या पार्श्वभूमिवर केंद्रीय उर्जा खात्याकडून राज्यांना सूचना केल्या आहेत.

केंद्रीय ऊर्जा खात्याने सर्व राज्यांना वीज जपून वापरा आणि वीजनिर्मितीसाठी उपाययोजना करा, अशा सूचना केल्या आहेत. स्थानिक पातळीवर वीज वाचवून टंचाई भासणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये पाऊस लांबल्यामुळे जलाशयातील पाणीसाठा वीज निर्मितीसाठी अपुरा पडत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सौरऊर्जा, पवन ऊर्जा यावर आधारित ऊर्जानिर्मिती प्रकल्पांना गती द्यावी, अशी सूचना केली आहे.

यासोबतच गॅस आणि कोळसा यावर आधारित ऊर्जानिर्मिती प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याची भूमिका केंद्र सरकारची आहे. त्यातूनच लांबलेल्या पावसाचा परिणाम होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने आतापासूनच खबरदारीच्या उपाययोजना करत आहे.

ऊर्जा मंत्रालयाच्या सूचना

शेतीचा भार सौरतासांवर हलविला जाऊ शकतो, निर्मिती केंद्रांची सर्व नियोजित देखभाल वेगाने पूर्ण करणे सक्तीने बंद केलेले विभाग लवकर परत सुरू करणे, कोळसा आयात करणे गॅस आधारित केंद्रांना पूर्ण क्षमतेने पुरवठा करणे, औष्णिक, सौर आणि पवन ऊर्जेची नवीन केंद्रे त्वरित कार्यान्वित करणे यासह अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान अनेक राज्यात पाण्याच प्रश्न गंभीर होत चालल्याने वीज निर्मीतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतातील बराच भाग शेतीवर अवलंबून असल्याने शेतीला पाणी, वीज न मिळाल्यास शेती उत्पादनावर संकट येण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Care In Summer: जनावरांमधील उष्णताजन्य ताण कमी करण्यासाठी उपाय

Urea Production: भारत- रशियाचा संयुक्त युरिया उत्पादन प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होणार, वार्षिक २० लाख टन क्षमता

Sericulture Farming: उन्हाळ्यातही रेशीम कोष उत्पादनात सातत्य

Livestock Safety: अवकाळी पाऊस, गारपीट आणि विजेचा पशूंवरील परिणाम

Indonesia’s Peanut Import Quota : इंडोनेशियाने शेंगदाणा आयातीसाठी नवीन कोटा प्रणाली केली लागू; भारताची निर्यात खोळंबणार

SCROLL FOR NEXT