Ankush Padwale Agrowon
ताज्या बातम्या

Innovative Farmer Award : अंकुश पडवळे यांना केंद्राचा नावीन्यपूर्ण शेतकरी पुरस्कार

भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे दर वर्षी हे पुरस्कार देशभरातील नावीन्यपूर्ण व शेतकऱ्यांना दिशादर्शक काम करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो.

Team Agrowon

Innovative Farmer Award सोलापूर : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) व भारतीय कृषी संशोधन संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘राष्ट्रीय नावीन्यपूर्ण शेतकरी पुरस्कार- २०२३’ महा ऑरगॅनिक ॲण्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश पडवळे (Ankush Padwale) (मंगळवेढा, जि. सोलापूर) यांना जाहीर करण्यात आला आहे.

भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे दर वर्षी हे पुरस्कार देशभरातील नावीन्यपूर्ण व शेतकऱ्यांना दिशादर्शक काम करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो. यापूर्वी ही पडवळे यांना केंद्र सरकार, राज्य सरकार व विविध स्वयंसेवी संस्थांकडून विविध पुरस्कार मिळाले आहेत.

पडवळे हे गटशेती, सेंद्रिय शेतीतून शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन व सहकार्य करीत असतात. तसेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न ते केंद्र व राज्य सरकार यांच्याकडे अभ्यासपूर्ण मांडतात. त्यांच्या या कामाचीच दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना हा राष्ट्रीय कृषी पुरस्कार जाहीर केला आहे.

हा पुरस्कार पुसा संस्थेच्या मेळावा ग्राउंडवर २ ते ४ मार्च दरम्यान होणाऱ्या पुसा कृषी विज्ञान मेळाव्यात ४ मार्च रोजी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर व केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या हस्ते देण्यात येईल. पडवळे यांना जाहीर झालेल्या राष्ट्रीय कृषी पुरस्काराबाबत त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT