Cauvery Water Crisis agrowon
ताज्या बातम्या

Cauvery Water Crisis : कर्नाटकचा महाराष्ट्रासोबत नाहीतर तामीळनाडूसोबत पाण्यावरून वाद उफाळला

Cauvery River : मागच्या कित्येक वर्षांपासून कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये संघर्ष सुरू आहे. दरम्यान हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Cauvery River News : कावेरी नदी पात्रातून कर्नाटकमधून तामिळनाडूला २४ हजार क्युसेक्स पाण्याची गरज आहे परंतु कर्नाटक पाटबंधारे विभागाने ५ हजार क्युसेक्सने पाणी सोडले आहे. यावर तामिळनाडूचे जलसंपदा मंत्री एस दुराई मुरूगन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने तामिळनाडू राज्यासाठी ५ हजार क्युसेकने पाणी सोडण्याचे आदेश कर्नाटक सरकारला दिले आहेत. दरम्यान या निर्णयावर तामिळनाडूचे जलसंपदा मंत्री एस दुराई मुरुगन यांनी नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले की, पिके वाचवण्यासाठी सलग १० दिवस दररोज २४ हजार क्युसेकने पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. परंतु ५ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्याचा निर्यण झाला. यात आमची पिके वाया जाण्याची शक्यता असल्याचे मंत्री एस दुराई मुरुगन यांनी सांगितलं.

यंदा पाऊस कमी झाला आहे यामुळे आम्हाला शेतकऱ्यांची पीके वाचवण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. खरिप पिकांना कमी पावसामुळे जास्त वेळ पाणी देण्याची गरज असल्याचे मत मंत्री एस दुराई मुरुगन यांनी व्यक्त केले.

दरम्यान मागच्या काही वर्षात पाऊस जास्त झाल्यावर पाणी सोडण्याचे मोठे नियोजन केले जाते परंतु सध्या तामिळनाडूतील शेतकऱ्यांना पाण्याची गरज असताना पाणी कमी सोडले जात असल्याची खंत दुराई यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी सलग १० दिवस २४ हजार क्युसेक पाणी सोडण्याची आमची मागणी असल्याचे दुराई म्हणाले. दरम्यान, कावेरी जल नियमन समितीच्या शिफारशीनुसार तामिळनाडूला १५ दिवस ५ हजार क्युसेकने पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.

दरम्यान तामीळनाडूला जादा पाण्याची आवश्यकता असल्याने तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याची माहिती एस दुराई मुरुगन यांनी दिली. तामिळनाडू आणि कर्नाटकमधील कावेरी पाणी व्यवस्थापन वादावर शुक्रवारी (1 सप्टेबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

यापूर्वी कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाकडून काल(ता.२९) बैठक घेतली. यामध्ये कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांच्या बाजू ऐकून घेण्यात आल्या. यासोबतच कावेरी जल नियमन समितीच्या शिफारशीही विचारात घेतल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT