Cashew Loan Agrowon
ताज्या बातम्या

Cashew Processing : काजू प्रक्रिया उद्योजकांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे

रत्नागिरीतील सव्वातीनशेहून अधिक काजू प्रक्रिया उद्योजकांवर बँकांकडून कारवाईची टांगती तलवार आहे.

टीम ॲग्रोवन

रत्नागिरी ः कोरोनातील परिस्थितीमुळे कोकणातील काजू उद्योग (Kokan Cashew Industry) आजारी पडला असून त्यांना वेळीच साथ दिली नाही तर हजारो लोकांचा रोजगार (Job Loss) बुडणार आहे. रत्नागिरीतील सव्वातीनशेहून अधिक काजू प्रक्रिया (Cashew Process) उद्योजकांवर बँकांकडून कारवाईची टांगती तलवार आहे.

सुमारे चाळीस कोटींहून अधिक रुपयांच्या कर्जाचे पुर्नगठन करावे; अन्यथा प्रक्रिया उद्योजक अडचणीत येईल, अशी मागणी काजू प्रक्रिया व्यावसायिकांनी माजी खासदार भाजपचे नेते नीलेश राणेंकडे केली. त्यांनीही व्यवसायिकांच्या अडचणी सोडवण्याचे आश्‍वासन दिले.

रत्नागिरी एमआयडीसी येथील काजू प्रक्रिया उद्योजक संदेश दळवी यांच्या दळवी काजू प्रकल्पाला गुरुवारी (ता. २९) भाजप नेते माजी खासदार नीलेश राणेंनी भेट दिली. या वेळी श्री. दळवी यांच्यासह काजू प्रक्रिया संघटनेचे विवेक बारगिर, काजू उद्योजक ऋषिकेश परांजपे, प्रताप पवार, संदेश पेडणेकर, दिनेश पवार, तौफिक खतीब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राणे यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करताना त्यातील वेगवेगळ्या युनिट्सची सविस्तर माहिती घेतली. त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. कोरोनामुळे दोन वर्षे उलाढाल थांबल्यामुळे उद्योजक अडचणीत आले आहेत. त्यांना वेळीच सावरणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे,

अशी मागणी काजू प्रक्रिया उद्योजकांनी श्री. राणेंकडे केली. कोविड कालावधीत व्यावसाय ठप्प झाल्यामुळे कर्जाचे हप्ते भरणे अशक्य झाले. थकित कर्जामुळे उद्योजकांना नव्याने कर्ज देण्यास बँका तयार नाहीत. थकित हप्ते वसुलीसाठी बँकांकडून व्यावसायिकांकडे तगादा लावण्यात येत असून मालमत्तेवर टाच येण्याची टांगती तलवार त्यांच्यावर आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे सव्वातीनशे काजू प्रक्रिया उद्योजक असून त्यांनी अंदाजित चाळीस कोटींच्या दरम्यान कर्ज उचलले आहे. मालाची विक्री न झाल्यामुळे या उद्योजकांना मोठा फटका बसला आहे. तर काहींचा माल कमी किमतीमध्ये विकला गेला.

त्या दोन वर्षांच्या परिस्थितीतून सावरणे काजू व्यावसायिकांना अशक्य असल्याने ते हवालदिल आहेत. यामधून त्यांना सोडविण्यासाठी कर्जाचे दहा वर्षांसाठी पुनर्गठन करून बँकांकडून थकित कर्जाच्या २५ टक्के रक्कम कर्ज स्वरूपात उद्योग पुन्हा उभारण्यासाठी दिले तरच यामधून सुटका होऊ शकेल.

अन्यथा व्यावसाय बंद होईल आणि याचा फटका काजू शेतकरी, प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या ७० टक्के महिला वर्गावर होणार आहे. रोजगार ठप्प होणार आहे. या मागण्या ऐकून घेतल्यानंतर नीलेश राणे यांनी कोकणातील काजू व्यवसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्‍वासन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Budget for Farmer 2026 : शेतकऱ्यांसाठी 'भारत-विस्तार एआय टूल', अर्थमंत्र्यांची घोषणा; नारळ, काजू आणि चंदन उत्पादकांसाठी घोषणा

Textile Industry: कापूस उद्योगासाठी मोठी घोषणा; वस्त्रोद्योगासाठी सर्वसमावेशक ५ कलमी कार्यक्रम जाहीर

Cultural Economy: निसर्गप्रधान जीवनशैली व सांस्कृतिक-अर्थकारण

National Waterways: पुढील पाच वर्षात २० राष्ट्रीय जलमार्ग सुरु करणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

Grass lands: गवताळ राने जपणे गरजेचे

SCROLL FOR NEXT