Cotton Fardad Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Fardad : `फरदड निर्मूलन मोहीम राबवा`

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या पुढील हंगामातील नियंत्रणासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फरदड निर्मूलन मोहीम राबवावी,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. डी. मालपुरे यांनी केले.

Team Agrowon

धुळे ः ‘‘कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या (Cotton Pink Bollworm) पुढील हंगामातील नियंत्रणासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फरदड निर्मूलन (Cotton Fardad) मोहीम राबवावी,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. डी. मालपुरे यांनी केले.

कापसाचा हंगाम मधल्या टप्प्यात आहे. काही ठिकाणी तो संपुष्टात येत आहे. गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी सध्या क्षेत्रीय स्तरावर कापूस फरदड निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र अधिक उत्पन्नासाठी काही ठिकाणी कापसाची फरदड घेण्याची शक्यता आहे.

फरदडीमुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र अखंडित सुरू राहते. त्याचबरोबर जिनिंग व प्रेसिंग मिल, गोडाउन, मार्केट यार्ड या ठिकाणी कच्च्या कापसाची दीर्घ काळासाठी साठवणूक केली जात आहे. त्यामुळे साठविलेल्या कापसामध्ये राहिलेल्या गुलाबी बोंड अळीच्या अवस्थांनंतर घेतल्या जाणाऱ्या कपाशी पिकासाठी स्रोतस्थान म्हणून काम करतात.

किडीस निरंतर खाद्य मिळत राहिल्याने पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. या पार्श्‍वभूमीवर गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित करून पुढील हंगामातील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अधिक व्यापक व प्रभावीपणे फरदड निर्मूलन मोहीम राबविण्याची ही अत्यंत योग्य वेळ आहे, असे मालपुरे यांनी म्हटले आहे.

जनावरे चरण्यास सोडावीत

बोंड अळीच्या नियंत्रणासाठी डिसेंबरअखेरपर्यंत सर्व गावांतील कापूस शेतातून पूर्णपणे काढून टाकावा व फरदड घेऊ नये, पाच ते सहा महिने कापूसविरहित शेत ठेवणे, डिसेंबरनंतर खाद्य उपलब्ध न झाल्यास गुलाबी बोंड अळी सुप्तावस्थेत जाते; परंतु फरदडीमुळे किडीचे जीवनचक्र अखंडितपणे सुरू राहते.

प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये. रोटाव्हेटर किंवा श्रेडर यांसारख्या यंत्राद्वारे पऱ्हाट्यांचे छोटे तुकडे करून ते जमिनीत गाडावेत, असे मालपुरे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT