Leopard Attack Agrowon
ताज्या बातम्या

Leopard Attack : अंबासनला बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

Nashik Leopard News : शिरवाळ नाल्यानजीक शेतकरी सदाशिव शंकर शेलार यांच्या शेतातील बंदिस्त गोठ्यात नेहमीप्रमाणेच बैल, गायी तसेच वासरे दावणीला बांधलेली होती.

Team Agrowon

Nashik News : येथील शिरवाळ नाल्यानजीक असलेल्या शेतातील बंदिस्त गोठ्यात लोखंडी जाळी उचकटून बिबट्याने प्रवेश केला व तीन वर्षांच्या गोऱ्ह्याला ठार केल्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. ताहाराबाद वनपरीक्षेत्रातील कर्मचारी व पशुवैद्यकीय आधिकाऱ्यांनी पंचनामा केला.

शिरवाळ नाल्यानजीक शेतकरी सदाशिव शंकर शेलार यांच्या शेतातील बंदिस्त गोठ्यात नेहमीप्रमाणेच बैल, गायी तसेच वासरे दावणीला बांधलेली होती. शुक्रवारी (ता. ११) पहाटेच्या सुमारास सदाशिव हे दुधारू गायीचे दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना गोठ्याची लोखंडी संरक्षक जाळी उचकटून बिबट्याने प्रवेश केल्याचे निदर्शनास आले.

गोठ्यात दावणीला बांधून ठेवलेल्या गोऱ्ह्यावर हल्ला चढवून पोबारा करण्याचा प्रयत्न केला असल्याचे घटनास्थळावरून दिसून आले. मात्र दावणीला बांधून ठेवलेली दोरी तुटली नसल्याने बिबट्याने लोखंडी जाळीबाहेरच गोऱ्हा फस्त केला.

याबाबत श्री. शेलार यांनी आजूबाजूस असलेल्या शेतकऱ्यायां माहिती दिली व भ्रमणध्वनीवरून ताहराबाद वनपरिक्षेत्रात याबाबत माहिती देताच वनकर्मचारी रेणुका आहिरे व पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय आधिकारी डॉ. चंदन रुद्रवंशी यांनी पंचनामा केला.

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा

या परिसरात बहुतांश शेतकरी शेतात राहतात. लहान मुले शाळेत ये-जा करण्यासाठी एकटीच घराबाहेर पडत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून ध्वनिक्षेपकातून सावधानता बाळगण्याची सूचना केली आहे.

दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ताहराबाद वनपरिक्षेत्रात पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून आलेल्या पत्राची दखल घेऊन वन विभागाकडून या परिसरात पिंजरा लावण्याचे काम शुक्रवारी (ता. ११) सायंकाळपर्यंत सुरू होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Papaya Crop: पपई पिकाला यंदा जेमतेम फळधारणा

Micro Irrigation: ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेतून अनुदान

Rahul Gandhi On Vote Chori : मत चोरीवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर राहुल गांधींनी केले गंभीर आरोप; निवडणूक आयोगाकडे मागवले उत्तर

Rabbi Anudan GR: कोकणातील शेतकऱ्यांना २९ कोटींचे रब्बी अनुदान मिळणार

Soybean MSP: उपबाजारपेठ तिर्थपुरीत शनिवारपासून सुरू होणार सोयाबीन हमीभाव केंद्र

SCROLL FOR NEXT