Agriculture Education
Agriculture Education Agrowon
ताज्या बातम्या

‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’द्वारे घडवा यशस्वी करिअर

टीम ॲग्रोवन

पुणे : कृषी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार (Employment In Agriculture Sector) देण्याची क्षमता असून विविध व्यवसाय करण्याला भरपूर वाव आहे. हे क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. यात कुशल व अनुभवी मनुष्यबळाची मागणीदेखील (Manpower Demand) वाढत आहे. पदवीधर (ग्रॅज्युएट) (Agriculture Graduate) युवकांना या क्षेत्रात करिअरला उत्तम संधी आहे. यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन व फिल्डवरील कामाचा अनुभव असणे गरजेचे असते. या सर्व घटकांचा एकत्रित समावेश असलेला, प्रात्यक्षिकांवर आधारित, इंडस्ट्री संलग्न ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ हा एक वर्षाचा पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम ‘सकाळ’ आणि ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे तयार करण्यात आला आहे.

दरवर्षी या अभ्यासक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेत असतात. २०२२ साठीच्या शैक्षणिक वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीच्या संधी उपलब्ध होतात तसेच उद्योजक होण्याचा आत्मविश्वास देखील मिळतो.

शिक्षणाचा बदलता ट्रेंड लक्षात घेता त्याला अनुसरून अभ्यासक्रमाची रचना करणे आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम पूर्णपणे इंडस्ट्रीच्या मार्गदर्शनाखाली व त्यांना अपेक्षित कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. ‘CAMP’ या मॉडेलवर आधारित या अभ्यासक्रमात कंटेंट, असाईनमेंट, मास्टर क्लासेस आणि प्रोजेक्ट्स थेट इंडस्ट्रींकडून विद्यार्थ्यांना दिले जातात. तसेच ‘LCI’ (लर्न ऍन्ड कॉन्ट्रीब्युट इनिशिएटिव्ह) म्हणजेच ‘शिका आणि योगदान द्या’ या संकल्पनेनुसार इंडस्ट्रीसोबत कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळते. ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना स्वतःला अपग्रेड करण्यासाठी, चांगली नोकरी मिळण्यासाठी तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील होतो.

अभ्यासक्रमात शेतमाल निर्यात (एक्सपोर्ट), दुग्धव्यवसाय तंत्रज्ञान (डेअरी टेक्नॉलॉजी) व अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान (फूड टेक्नॉलॉजी) या अधिक वेगाने विस्तारणाऱ्या क्षेत्रातील विषयांचा समावेश आहे. दोन सेमिस्टरमध्ये त्यावर भर दिला जातो. याशिवाय स्टार्ट अप सुरु करण्यासाठीची मानसिकता तयार करणे, डिझाईन थिंकिंग फॉर इनोव्हेशन, विद्यार्थ्यांचे आयुष्यातील उद्दिष्ट इ.विषयी मार्गदर्शन केले जाते. बीएस्सी ॲग्री, बीई, बीए, बीकॉम, बीबीए, बीसीए तसेच इतर कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड परिक्षा व वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाते.

अभ्यासक्रमाचे वेगळेपण ः

-इंडस्ट्री व विद्यार्थी यातील पोकळी भरून काढणारा अभ्यासक्रम

-वेळोवेळी नामांकित इंडस्ट्री तज्ज्ञ, विषय विशेषज्ञांकडून मार्गदर्शन

-शिका व योगदान द्या (लर्न ॲण्ड कॉन्ट्रीब्युट इनिशिएटिव्ह) याद्वारे सहा महिने इंडस्ट्रीसोबत कामाचा अनुभव

-ॲग्री कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारा नोकरीसाठी साहाय्य

-कोर्सनंतर विद्यार्थ्यांना स्टार्ट अप, व्यवसायासाठीचे मार्गदर्शन

प्रवेश अर्ज व सविस्तर माहितीसाठी

-संपर्क: ७२१९६११३०६.

-स्थळ: एसआयआयएलसी, सकाळनगर गेट क्र.१, बाणेर रस्ता, औंध, पुणे

-संकेतस्थळ www.siilc.edu.in

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT