K. Chandrashekhar Rao
K. Chandrashekhar Rao Agrowon
ताज्या बातम्या

K. Chandrshekhar Rao : ‘बीआरएस’ महाराष्ट्रात करणार पक्ष विस्तार

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर ः तेलंगणाचे शेती मॉडेल (Telanagana Agriculture Model) देशपातळीवर गौरविण्यात आले आहे. त्याचाच आधार घेत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी ‘अबकी बार किसान सरकार’चा नारा देत पक्ष विस्ताराचा निर्णय घेतला आहे.

त्याकरीता ‘बीआरएस’ (भारत राष्ट्र समिती) (Nharat Rashtra Samiti) पक्षाची स्थापना करण्यात आहे. त्यानुसार महाराष्ट्रात जानेवारीअखेर नांदेड येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे.

राव यांनी शेतकरी हिताच्या अनेक योजनांवर काम करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांसह समाजातील इतर घटकांच्या उत्कर्षासाठी तेलंगणामध्ये तब्बल ४१० योजना राबविल्या जात आहेत.

या अंतर्गंत ८५ हजार शेतकरी कुटूंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात आले आहेत. सातबाराधारक व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यास दहा दिवसांत त्याच्या खात्यात ही रक्‍कम टाकली जाते.

राव यांनी तलाठी व्यवस्थाच संपुष्टात आणली आहे. त्यसाठी १२ हजार ७०० तलाठी दुसऱ्या खात्यात वळते केले. शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा, शेतीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पाच हजार एकरांचे क्‍लस्टर केले.

इतक्‍याच क्षेत्रासाठी स्वतंत्र कार्यालय दिले. या कार्यालयात अधिकाऱ्यांसह वेळप्रसंगी आमदार, खासदार जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवितात. या मॉडेलचा आधार घेत देशाच्या राजकारणात पक्षाची बांधणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

त्याकरीता ‘टिआरएस’चे दसऱ्याला नामांकन करुन भारत राष्ट्र समिती पक्ष (बीआरएस) व भारत राष्ट्र किसान समिती संघटना (बीआरकेस) ची बांधणी करण्यात आली.

ऑगस्ट महिन्यात देशभरातील शेतकरी नेत्यांना तेलंगणात एकत्रित करुन त्यांच्याशी चर्चेतून अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.

या साऱ्यातून आता काही व्यक्‍तींकडे जबाबदारी सोपविली आहे. महाराष्ट्रात शेतकरी संघर्ष समितीचे माणिक कदम यांना समन्वयक नेमले आहे. जानेवारीअखेर राव यांची पक्ष बांधणीच्या उद्देशाने पहिली सभा नांदेडला होईल.

विकसित शेतीचे मॉडेल तेलंगणाने दिले. फक्‍त बोलण्यापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी कृतीतून ते सिध्द केले. त्यामुळेच चंद्रशेखर राव यांच्यासोबत जाण्याचा आनंद आहे.

- ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष, लोकजागर.

तेलंगणाने शेतकरी व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेत सर्वांचे जीवन सुखकर केले. शेतकरी आत्महत्या शुन्य अशी या राज्याची ओळख आहे. हे महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना का शक्‍य झाले नाही. त्यामुळेच चंद्रशेखर राव यांच्या पक्ष आणि संघटनेला राज्यात प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.

- माणिक कदम, समन्वयक, भारत राष्ट्र समिती, महाराष्ट्र.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

SCROLL FOR NEXT