Millets In Diet Agrowon
ताज्या बातम्या

Millet Diet : तृणधान्य आहार चळवळीला व्यापक स्वरूप

तृणधान्याच्या आहारातून पोषक सात्त्विकतेचा संदेश गावोगावी पोहोचावा या उद्देशाने तृणधान्य आहार चळवळीला बचत गटाच्या माध्यमातून व्यापक स्वरूप देता आले, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

Team Agrowon

नांदेड : तृणधान्याच्या आहारातून (Millet Diet) पोषक सात्त्विकतेचा संदेश गावोगावी पोहोचावा या उद्देशाने तृणधान्य आहार चळवळीला (Millet Diet Movement) बचत गटाच्या माध्यमातून व्यापक स्वरूप देता आले, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद व माविमच्या वतीने जिल्हा परिषद आवारात तृणधान्याचे महत्त्व व्यापक व्हावे, यासाठी ज्वारी, नाचणीच्या ताज्या भाकऱ्या व ठेचा, हुरडा स्टॉलच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

लहान व अर्धापूर येथील बचत गटांच्या महिलांनी जिल्हा परिषदेच्या आवारात नियोजित ठिकाणी नाचणी व ज्वारीच्या चुलीवरील भाकरी, चटणी, ठेचा, हुरडा याची अपूर्व प्रातिनिधिक स्वरूपात मेजवानी दिली.

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समिती, अंगणवाडी सेविका व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तृणधान्याचे आहारातील महत्त्व यावर संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित केले.

‘‘आहाराला आरोग्यवर्धक पोषक आशा स्लो फूड, अर्थात तृणधान्यांकडे वळविण्याचा हा प्रयत्न’’ असल्याचे जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

तृणधान्य आहारावर आरोग्य उत्तम...

इथल्या मातीच्या गुणधर्मानुसार व पर्यावरणातील विविधतेनुसार मानवी शरीराला पोषक मूल्य देणारे अनेक तृणधान्य निसर्गाने देऊ केलेले आहेत. अनेक पिढ्यांपासून आपण ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी, राजगिरा ही तृणधान्य खात आलो आहोत. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी याच आहारावर आपले आरोग्य उत्तम ठेवले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT