
अमरावती : आंतरराष्ट्रीय तृणधान्य (International Millets Years) वर्षाच्या निमित्ताने विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यात व्यापक जागृती मोहीम राबविण्यात आली.
तब्बल १००० ग्रामपंचायतींअंतर्गत असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीच्या माध्यमातून दैनंदिन आहारात तृणधान्यांचा (Millets In Diet) समावेश करण्याचा संदेश दिला.
संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे. यामध्ये भारताचा मोठा सहभाग आहे.
भरडधान्य उत्पादनात भारताचा वाटा आशिया खंडात ८० टक्के तर एकूण जागतिक उत्पादनात २० टक्के आहे.
त्या पार्श्वभूमीवर ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा या पिकांचे उत्पादन वाढीबरोबरच आरोग्य विषयक फायदे लक्षात घेता आहारात त्यांचे प्रमाण वाढविणे हा हेतू आहे.
तृणधान्य वर्षाच्या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला एक उपक्रम राबविला जाणार आहे.
पीकनिहाय हा उपक्रम राहील. विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळकरी मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली.
मुलांमध्ये तृणधान्याचे महत्त्व वाढीस लागावे व त्यातून त्यांनी घरात अशा धान्या करता आग्रह धरावा, अशी भूमिका या आयोजना मागे होती. १००० गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.
चांदूरबाजार तालुक्यात तालुका कृषी अधिकारी एस. पी. दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या उपक्रमात कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामपंचायत सचिव सहभागी झाले होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.