Nagpur Orange  Agrowon
ताज्या बातम्या

Nagpur Orange : ‘जी २०’मध्ये नागपुरी संत्र्याऐवजी टायगर कॅपिटल म्हणून ब्रॅण्डिंग

संत्रा हे विदर्भाचे मुख्य फळपीक त्यामुळेच नागपूरला ऑरेंजसिटी अशी ओळख मिळाली आहे. मात्र जी-२० गटाच्या परिषदेची बैठक नागपुरात होत असताना ही ओळख पुसत टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असे नागपूरचे ब्रॅण्डिंग केले जाणार असल्याने संत्रा बागायतदारांमध्ये असंतोष व्यक्‍त होत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर ः संत्रा हे विदर्भाचे मुख्य फळपीक (Fruit Crop) त्यामुळेच नागपूरला ऑरेंजसिटी (Orange City) अशी ओळख मिळाली आहे. मात्र जी-२० गटाच्या परिषदेची (G-20 Conference) बैठक नागपुरात होत असताना ही ओळख पुसत टायगर कॅपिटल ऑफ इंडिया (Tiger Capital Of India) असे नागपूरचे ब्रॅण्डिंग केले जाणार असल्याने संत्रा बागायतदारांमध्ये असंतोष व्यक्‍त होत आहे. विशेष म्हणजे या संदर्भातील नियोजन पर्यटन विकास महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे.

भारतासह १९ देश आणि युरोपीय महासंघाचा समावेश असलेल्या जी-२० परिषदेचे यजमानपद यंदा भारताला मिळाले आहे. त्यातील एक बैठक देशाचे मध्य असलेल्या नागपुरात मार्च २०२३ मध्ये प्रस्तावित आहे. हे विदर्भासाठी मोठे भूषणावह ठरले आहे. मात्र याच बैठकीच्या निमित्ताने विदर्भाची ओळख असलेल्या संत्र्याऐवजी वाघांचे ब्रॅण्डिंग करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

त्या संदर्भातील सूचनादेखील पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राकडून यावर अपेक्षित काम करण्याचे नियोजन सुरू आहे. या साऱ्या घडामोडी घडत असताना याबद्दल नागपुरी संत्रा उत्पादकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. २०२२ या वर्षातील जनगणनेनुसार राज्यात ३१२ वाघ आहेत. यातील २०० वाघ एकट्या विदर्भात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नागपुरी संत्र्याला जागतिक ओळख मिळवून देण्याची ही नामी संधी आहे. या संधीचा उपयोग नागपुरी संत्र्याचा ब्रॅण्डिंगसाठी केल्यास उत्पादकांना येत्या काळात त्याचा फायदा होईल. त्याकरिता गिफ्ट म्हणून जी-२० सदस्यांना नागपुरी संत्रा फळे दिली पाहिजेत. या टेबल फ्रूटची चव आवडल्यास संबंधित देशात निर्यात वाढेल. मार्च २०२३ मध्ये ही बैठक होणार आहे. त्या वेळी मृग बहरातील संत्रा फळे राहतात.

- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT