Cotton Market Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Variety : खानदेशात कापसाच्या सरळ वाणांचा काळाबाजार

Cotton Market : खानदेशात कृषी विभागाकडून कापसाच्या सरळ किंवा देशी सुधारित, देशी संकरित वाणांचा पुरवठा अपेक्षित होत नसल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कृषी विभागाकडून कापसाच्या सरळ किंवा देशी सुधारित, देशी संकरित वाणांचा पुरवठा अपेक्षित होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे या वाणांचा काळाबाजार वाढला आहे. मागणी अधिक असून, एका ४३५ ते ४५० ग्रॅम वजनाच्या पाकिटाची विक्री तब्बल चार ते पाच हजार रुपयांनी सुरू आहे.

सरळ वाणांची खानदेशातील मागणी किमान दोन ते अडीच लाख पाकिटांची आहे. परंतु पुरवठा अत्यल्प आहे. यातच काही सरळ वाणांचा पुरवठा कंपन्यांकडून झालेलाच नाही. यामुळे या वाणांचा मोठा काळाबाजार सुरू आहे. यंदा एका कंपनीने या वाणांचा पुरवठाच करू शकणार नाही, असे म्हटले आहे. यामुळे आणखीच अडचण होऊन काळाबाजार फोफावला आहे.

काही एजंट गुजरात, मध्य प्रदेशातून या वाणांची खरेदी करीत आहेत. त्याची विक्री जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, धरणगाव, भडगाव, जामनेर, रावेर, एरंडोल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा या भागांत अव्वाच्या सव्वा दरात सुरू आहे.

हा काळाबाजार रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यंदा खानदेशात ‘एचटीबीटी’ किंवा ‘बोलगार्ड पाच’ या वाणांच्या नावाखाली बियाण्याची विक्री काळ्याबाजारात एप्रिलपासून सुरू होती.

परिणामकारक कारवाईचा अभाव

दोन कंपन्यांच्या बनावट कापूस बियाण्याचा काळाबाजार जोरात सुरू आहे. या कंपनीच्या वाणांची विक्री किमान चार हजार रुपये प्रतिपाकिट या दरात केली जात आहे. काही जण मध्य प्रदेशातून काळ्या बाजारात या बियाण्यांची खरेदी करीत आहेत. कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे, पण ही कारवाई पुरेशी नसल्याची स्थिती आहे.

सरळ वाण लागवडीला पसंती

खानदेशात रावेर, शहादा, तळोदा भागांतील केळी उत्पादक बेवडसाठी सरळ वाणांची लागवड करतात. तर पारोळा, अमळनेर, जामनेर, धरणगाव, शिरपूर व इतर भागांतील टंचाईचा सामना करणारे शेतकरी सरळ वाण लागवडीला पसंती देतात. कमी पाणी आणि फवारणी, खतांच्या अल्प खर्चात सरळ वाणांद्वारे चांगले उत्पादन खानदेशात अनेक शेतकरी घेतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT