Biological Fencing  Agrowon
ताज्या बातम्या

Biological Fencing : जंगलालगतच्या शेतीचे जैविक कुंपण करणार संरक्षण

Wild Animal Crop Damage Protection : वन्यप्राण्यांच्या माध्यमातून शेती पिकाचे सर्वाधिक नुकसान होणाऱ्या गावांमध्ये जैविक कुंपणाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

Team Agrowon

Chandrapur News : वन्यप्राण्यांच्या माध्यमातून शेती पिकाचे सर्वाधिक नुकसान होणाऱ्या गावांमध्ये जैविक कुंपणाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याकरिता पहिल्या टप्प्यात चार गावांची निवड करण्यात आली असून, या गावांमध्ये प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता ग्रामसभा घेण्यात आली आहे.

चंद्रपूर हा वाघाचा जिल्हा म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. राज्यातील एकूण जंगल क्षेत्रापैकी २७.६६ टक्के वनक्षेत्र एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील बहुतांशी गावे जंगला शेजारी असल्याने मानव वन्यजीव संघर्ष नेहमीचाच ठरतो. वन्यजीवांना जंगलात खाण्यासाठी काही उपलब्ध नसेल अशावेळी ते गावात शिरतात त्यासोबतच जंगलालगत असलेल्या शेतातील पिकाची नासाडी करतात.

चंद्रपूरचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी ही बाब गांभीर्याने घेत गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक भरपाई देण्यात आलेल्या गावांवर लक्ष केंद्रित केले. या दहा गावांतील सरपंच, कृषी सहायक, वन कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्याकरिता जैविक कुंपणाचा प्रस्ताव मांडण्यात आला.

जैविक कुंपण मोहिमेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या ग्रामस्थांसोबत काम करण्याचे या बैठकी ठरले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात या उपक्रमात सहभागी होण्यास दहा पैकी चार गावांनी सहमती दर्शविली आहे. एक किलोमीटरसाठी सरासरी अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च होणार असून, त्यामध्ये खोदकाम, झाडे लावणे या कामांचा अंतर्भाव आहे.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून याकरिता निधी उपलब्धतेचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर सादर केला जाणार आहे. सामूहिक जैविक कुंपण प्रकल्पात समावेशित गावांमध्ये मारोडा, वासेरा, तळोधी, टेकेपार या गावांचा समावेश आहे.

...अशी आहे संकल्पना

जंगलाच्या बाजूने घायफास लागवड केली जाईल. त्यानंतर बांबू आणि करवंद याची लागवड केली जाणार आहे. बांबू आणि करवंद या माध्यमांतून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न होईल. जंगलाच्या बाजूनेच टॉप चार मीटर, खोली दीड मीटर, बेस एक मीटर याप्रमाणे चर खोदण्यात येणार आहे.

याची माती शेती असलेल्या भागाच्या बाजूने टाकली जाईल. चराच्या मध्ये साचलेल्या पाण्याचा उपयोग पुनर्भनासाठी होणार आहे. जंगली जनावरे आल्यास पिण्याकरता तसेच लागवड केलेल्या झाडांना देखील यातील पाणी उपलब्ध होईल.

चरातील अतिरिक्त पाणी शेततळे असल्यास त्यात सोडता येणार आहे. परिणामी, पर्यावरणपूरक व आर्थिक सक्षमतेला प्रोत्साहन देणारा असा उपक्रम ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT