APMC Election
APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election : पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी मोठी चुरस

Team Agrowon

Pune News : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांना लिटमस टेस्ट असलेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी (APMC Election) मोठी चुरस निर्माण झाली आहे.

इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर उमदेवारी अर्ज दाखल झाले असून, सर्वच पक्षांच्या नेत्यांपुढे पक्षातील बंडखोरी रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील पुण्यासह (हवेली) जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, नीरा, भोर आदी विविध बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सोमवारी (ता. ३) अखेरच्या दिवसापर्यंत ५४२ अर्जांची विक्री होऊन ३०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये सेवा सहकारी संस्था-१६५, ग्रामपंचायत-७०, व्यापारी- अडते-४०, हमाल-तोलनार गटातून २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

पुणे बाजार समितीत आडते गटात मोठी चुरस निर्माण झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या गटातील सर्वच उमेदवारांनी आम्हाला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्याने सर्वच उमेदवार आणि नेते संभ्रमात आहेत.

भोर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ८४ अर्ज दाखल झाले आहेत. नीरा बाजार समितीसाठी १४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, सर्वाधिक १०३ अर्ज सोसायटी मतदार संघातून दाखल झाले आहेत. इंदापूरमध्ये १५७ अर्ज दाखल झाले आहेत.

जुन्नर बाजार समितीसाठी १६३ अर्ज दाखल झाले आहेत. तर मंचर बाजार समितीसाठी १८२ अर्ज दाखल झाले आहेत. दौंड बाजार समितीसाठी २१७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

मंचरला शिवसेना-भाजप रिंगणात

मंचर बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची एकहाती सत्ता आहे.

या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र टक्कर देणार असून, यासाठी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे.

तर महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) गटाला अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसने आश्‍वासन न दिल्‍याने शिवसेना संभ्रमात आहे.

बारामतीत राष्ट्रवादीचे धक्का तंत्र

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी ६६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी दिली.

ही निवडणूक भाजप ताकदीने लढविणार हे सोमवारीच (ता.३) जाहीर केलेले असल्याने निवडणूक बिनविरोधची शक्यता मावळली होती.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज दोन संचालक वगळता इतर सर्व नवीन चेहरे देत धक्का दिला आहे. प्रस्थापितांना हा एक प्रकारे अजित पवार यांनी इशाराच दिल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, भाजपने १८ जागांसाठी २८ उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी दिली. काही अपक्षांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

जुन्नरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना

जुन्नर बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून, संजय काळे विद्यमान सभापती आहेत. मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधूनच विरोध असल्याची चर्चा असून, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अर्ज दाखल केल्याने काळे यांची धाकधूक वाढली आहे.

तर महाविकास आघाडीत पण फूट पडली असून, शिवसेना (ठाकरे) गट स्वतंत्र निवडणूक लढत असल्याने देखील काळे यांच्यापुढे आव्हान उभे राहिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrotourism Income : कृषी पर्यटनातून साधावी उत्पन्न वाढीची संधी

Agriculture Advisory : कृषी सल्ला (मराठवाडा विभाग)

Soybean Seeds : स्वतःचे सोयाबीन बियाणे वापरा

Pune water scarcity : पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट! धरणांमध्ये फक्त २३ टक्केच पाणीसाठा

Crop Management : हिरवळीच्या खतांसाठी विविध पिकांचे नियोजन

SCROLL FOR NEXT