Leopard Safari Agrowon
ताज्या बातम्या

Leopard Safari : जुन्नर बिबट्या सफारीसाठी अर्थसंकल्पात घोषणा

गेल्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी गाडीखेल (ता. बारामती) येथील बिबट्या सफारीसाठी ६० कोटींची तरतूद केली होती.

Team Agrowon

Maharashtra Budget 2023 पुणे ः मानव-बिबट्यातील संघर्ष (Human Leopard Clash) कमी करण्याबरोबरच बिबट्या सफारीद्वारे पर्यटन विकास आणि रोजगार निर्मितीसाठी (Employment Generation) उभारण्यात येत असलेल्या जुन्नर बिबट्या सफारीची (Leopard Safari) घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी केली. मात्र यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

गेल्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी गाडीखेल (ता. बारामती) येथील बिबट्या सफारीसाठी ६० कोटींची तरतूद केली होती. मात्र विरोधानंतर आणि सत्तांतरानंतर बारामतीची बिबट्या सफारी रद्द करत मूळ जुन्नरला करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला.

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांमध्ये आणि नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीगोंदा आणि पारनेर या तालुक्यांमध्ये गेल्या २० वर्षांपासून बिबट्या आणि मानव संघर्ष वाढला आहे. प्राथमिक पातळीवर वनक्षेत्रालगत असलेला हा संघर्ष आता मानवी वस्तीवर येऊन धडकला आहे.

हा संघर्ष कमी करण्यासाठी उसात स्थिरावलेल्या आणि मानवी वस्तीपर्यंत आलेल्या बिबट्यांना एकत्र करत, बिबट्या सफारीची संकल्पना माजी आमदार शरद सोनवणे यांनी २०१८ मध्ये मांडली.

यानंतर प्रशासकीय पातळीवर विविध टप्प्यांवर या सफारीबाबत विचार विनिमय होऊन, आंबेगव्हाण येथे जागा वन विभागाद्वारे अंतिम करण्यात आली. यानंतर आता या प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखडा तयार झाला आहे.

या आराखड्यानुसार सफारीसाठी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली. मात्र ठोस आर्थिक तरतूद नसल्याने संभ्रम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena UBT Crisis: ठाकरेंच्या ६ खासदारांची बैठकीला दांडी, आता 'ऑपरेशन तुडवा' सुरु, बंडखोरांना राऊतांचा इशारा

Agrowon Podcast: कापूस स्थिर; हिरवी मिरची टिकून , लसणाला उठाव, बेदाणा आवक कमी तर टोमॅटोला मागणी

Paddy Seedlings: भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Krishna River Upasa: ‘कृष्णे’तून उपसा, रोखायला भरारी पथके

Crop Loan Applications: पीककर्ज प्रस्तावांत वाढ; वितरण मात्र संथ

SCROLL FOR NEXT