Bogus Urea Racket Agrowon
ताज्या बातम्या

Urea Racket : युरियाचा काळाबाजारः २० लाखांचा युरिया जप्त, मुंबई रॅकेट असल्याची चर्चा

Nashik Urea News : नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० लाख रूपयांचा युरिया जप्त करण्यात आला.

Team Agrowon

Nashik Urea Racket : नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत युरियाचा काळा बाजारप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अनुदान जाहीर केलेल्या भारतीय जन उर्वरक परियोजना शिक्का असलेल्या युरियाच्या गोणी भरून नेत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (ता. २५) ही मोठी कारवाई केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार पहाटे १ वाजेच्या सुमारास निफाड तालुक्यातील भरवस फाटा परिसरात छापा मारून काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा २० लाख रुपये किंमतीचा युरिया खताचा मोठा साठा ताब्यात घेतला आहे.

निफाड तालुक्यातील लासलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भरवस फाटा नांदगाव रस्त्यावरील एका वस्तीवर ही कारवाई करण्यात आली. केंद्र शासन अनुदानित प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परीयोजना शिक्का असलेल्या २० लाख रुपयांच्या ४०० ते ५०० गोण्यामधील युरिया खत दुसऱ्या खाजगी गोण्यामध्ये भरून नेण्यात येत होता.

मुंबईला घेऊन जाणारा एमएच १८ बीएच १७८६ हा ट्रक निफाडला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. यामध्ये एका संशयितासह सदर ट्रकचा चालक व वाहक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माहिती दिली.

शेतकऱ्यांना मुबलक युरिया मिळावा म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परीयोजना चालू केली. या अंतर्गत शेतकऱ्यांना युरियाची गोणी २६० ते २८० रुपयांना मिळते.

युरिया तस्करांना ही गोणी २००० हजार रुपये दराने विकली जाते तर युरिया तस्कर ही गोणी मुंबईत ५००० रुपये प्रमाणे विक्री करतात अशी चर्चा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT