नाशिक ः मकर संक्रांतीच्या दरम्यान भोगी सणाचा (Bhogi Festival) दिवस तालुक्यातील विविध गावांमध्ये पौष्टिक तृणधान्य (Millet Crop) म्हणून विविध पद्धतीने साजरा करण्यात आला.
पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगत व पौष्टिक तृणधान्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी भोगी सणाचा दिवस पेठ तालुक्यातील विविध गावांमध्ये विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
तसेच, कृषी विभागामार्फत (Department of Agriculture) मकर संक्रांतीचा भोगीचा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन (Millet Day) म्हणून साजरा करण्यात आला.
तालुक्यातून जोगमोडी येथून त्र्यंबकेश्र्वर येथे निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीत कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होऊन पौष्टिक दिनाचा प्रचार, प्रसार करण्यात आला.
तसेच वडबारी येथील अंगणवाडी केंद्रात बचत गटातील महिलांना पौष्टिक तृणधान्य, नागली, वरई, बाजरी या पिकांचे उत्पादन वाढीच्या तंत्रज्ञाविषयी माहिती देण्यात आली.
पेठ येथील डॉ. बीडकर जनता विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात कृषी विभागातर्फे महाविद्यालयीन युवक-युवतींना नागली, वरई, बाजरी, राळा या पेठ तालुक्यात येऊ शकणाऱ्या भरडधान्याच्या उत्पादन तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यात आली.
तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रम दोनवाडे या गावात राबविण्यात आला. येथे बाजरीचे सुधारित बियाणे कृषी विभागामार्फत वाटप करण्यात आले.
तसेच पेठ, खिरकडे, तिर्डे, शिंदे, कुंभारबारी या गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमात पेठ तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब शेलार, मुकेश महाजन, कृषी पर्यवेक्षक विनायक पवार, प्रदीप कखर, संजय साबळे, दिलीप वाघेरे, कृषी सहाय्यक योगेश घांगळे,रमेश चौधरी,राहूल आहेर उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.