Bhimthadi Jatra
Bhimthadi Jatra Agrowon
ताज्या बातम्या

Bhimthadi Jatra : भीमथडी जत्रा २१ डिसेंबरपासून सुरू

टीम ॲग्रोवन

पुणे : महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, (Agriculture Development Trust) भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही भीमथडी जत्रेचे (Bhimthadi Jatra) २१ ते २५ डिसेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

ही जत्रा शिवाजीनगर (सिंचननगर) येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरणार असल्याचे भीमथडी जत्रेच्या आयोजिका सुनंदा पवार यांनी सांगितले. भीमथडी जत्रेत भरडधान्याचे (मिलेट-नावणी, राळ, सावा, भगर, सामा, वरई) वेगळे दालन असणार आहे. याशिवाय वैविध्यपूर्ण वस्तूंसह, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंचे स्टॉलदेखील असणार आहेत.

यंदाची भीमथडी जत्रा १६ व्या वर्षांत पदार्पण करत असून, महाराष्ट्राची कलासंस्कृती (गोंधळी, पोतराज, भारुड, ज्योतिषी, पाथरवट, बुरुद, केरसोनीवाले, नंदीबैल) ग्रामीण वाद्य महोत्सव यांसह ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेल्या हस्तकला, उन्हाळी पदार्थ, चटण्या, मसाले, लोणची, कपडे, फळे पालेभाज्या, धान्य, कडधान्य इत्यादी उत्पादने विक्रीस उपलब्ध असणार आहेत.

महाराष्ट्रातील २३ जिल्हे, ७ राज्यांमधून आलेल्या महिला बचत गट व महिला उद्योजिकांचे ३४० स्टॉल असणार आहेत. तसेच पर्यावरण संवर्धन ही संकल्पना घेऊन देवराई हा उपक्रम, देशी वृक्षसंवर्धन व पर्यावरण वाचवा संदेश, अशी वेगवेगळी दालने असून, हायड्रोपोनिक्स शेती, मातिविना शेती, विषमुक्त पालेभाज्या, गायीचा गोठा, कुक्कुटपालन, शेळीपालन, किचन गार्डन, मत्स्य व्यवसाय, पुष्परचना, रेशीम व मधुमक्षिका, असे माहितीचे वैविध्यपूर्ण स्टॉल असणार आहेत.

पाच दिवस चालणाऱ्या भीमथडी जात्रेस आपण भेट द्यावी, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या जत्रेच्या अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या ९८२२५२९९८७ या मोबाईल क्रमांकावर अथवा www.bhimthadijatra.com यावर संपर्क साधावा.

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती ही संस्था गेली पाच दशके कृषी शिक्षण, जलसंधारण, प्रशिक्षणे, महिला बचत गट, महिला सबलीकरण आशा वेगवेगळ्या क्षेत्रामधे कार्य करीत आहे. यापैकी एक उपक्रम म्हणजे भीमथडी जत्रा, ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी या हेतूने संस्थेच्या शारदा महिला संघ या विभागाच्या वतीने गेली १५ वर्षे या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात आहे.
कुंती पवार, आयोजिका, भीमथडी जत्रा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT