Bhandardara Dam Agrowon
ताज्या बातम्या

Bhandardara Dam : ‘भंडारदरा’चा विसर्ग घटवला

Bhandardara Dam Water Level: अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात सुरु असलेल्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे भंडारदरा धरणातील विसर्ग कमी केला आहे.

Team Agrowon

Nagar News : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात सुरु असलेल्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे भंडारदरा धरणातील विसर्ग कमी केला आहे. दरम्यान, निळवंडे धरणाचा पाणीसाठा ७३.४६ टक्के झाला आहे.

धरणात सव्वा सहा टीएमसी पाणीसाठा झाला आहे. भंडारदऱ्यात ८४ टक्के पाणीसाठा स्थिर आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात पावसाने दोन दिवसापासून उघडीप दिली आहे.

जिल्ह्यात अकोले तालुक्यातील घाटघर, रतनवाडी, भंडारदरा, पांजरे, वाकी परिसरात झालेल्या जोरदार पावसाने भंडारदरा, निळवंडे धरणात पाणीसाठा वाढत आहेत.

गेल्या आठ दिवसांतील जोरदार पावसामुळे पाणी आवक वाढली आहे. त्यामुळे ८४ टक्के पाणीसाठा स्थिर ठेवून भंडारदरा धरणातून विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे निळवंडेतही वेगाने पाणी जमा होत आहे.

सध्या निळवंडेचा पाणीसाठा ७३.४६ टक्के झाला आहे. ११ टीएमसी क्षमतेच्या भंडारदरातून २ हजार ७३३ क्युसेक वेगाने पाणी विसर्ग केला जात आहे. निळवंडे धरणातून शनिवारी (ता.२९) ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु केला होता.

मात्र, भंडारदऱ्यातून निळवंडेत होणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे निळवंडेतील विसर्ग थांबविला आहे. पावसाने दोन दिवसापासून उसंत दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT