Agricultural Festival Agrowon
ताज्या बातम्या

Barshi Agricultural Festival : बार्शीत आजपासून भगवंत कृषी महोत्सव

पाच दिवस आयोजन; महसूलमंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती (Barshi Agricultural Produce Market Committee) च्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या आणि बाजार समितीच्या अमृत महोत्सवानिमित्त आजपासून १३ नोव्हेंबरपर्यंत पाचदिवसीय राज्यस्तरीय भगवंत कृषी महोत्सवाचे ( Agricultural Festival) आयोजन करण्यात आले आहे. आज (ता.९) सायंकाळी सहा वाजता या महोत्सवाचे उद्‍घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होईल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांनी दिली.


सभापती राऊत म्हणाले, ‘‘मार्केट यार्डच्या मैदानावर भरवण्यात येणाऱ्या या महोत्सवाच्या उद्‍घाटनावेळी आमदार राजेंद्र राऊत उपस्थित राहतील. शेतकरी केंद्रबिंदू ठेवून या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याचे ठरविले. त्यानुसार या महोत्सवात वैविध्यपूर्ण अवजारे स्पर्धा, वैशिष्ट्यपूर्ण पशुधन प्रदर्शन, पीक स्पर्धा व पारितोषिके, महिला बचत गट मेळावा, डॉग शो, कृषी प्रात्यक्षिके, शेती अवजारांचे स्टॅाल्स असतील.’’ ‘‘या महोत्सवात सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. या निमित्ताने लहरी हवामान, फळछाटणीनंतर द्राक्षवेलीचे व्यवस्थापन, आदर्श गोठा व्यवस्थापन, एकर शंभर टन ऊसउत्पादनावरील विविध चर्चसत्रांसह महिला मेळाव्याचेही आयोजन केले आहे,’’ असेही ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ संचालक रावसाहेब मनगिरे, सचिव तुकाराम जगदाळे व अन्य संचालक उपस्थित होते.

‘दोन टनांचा रेडा, साडेतीन फुटांचा कोंबडा’
‘‘डेअरी तंत्रज्ञान व उत्पादने, कुक्कुटपालन, हॉर्टिकल्चर, सिंचन यंत्रणा, पशुधन विकास, सौरऊर्जा, जल व्यवस्थापन, शेतीमाल साठवणूक यंत्रणा, अपारंपरिक ऊर्जा, संरक्षित शेती, शेतविमा व अर्थसाहाय्य, शैक्षणिक संस्था, सहकार क्षेत्र, फार्म टेक्नॉलॉजी, उती संवर्धक तंत्रज्ञान, जैविक खते, फार्म मशिनरी याच्या आस्थापना व कंपन्यांचा यात सहभाग असेल. त्याशिवाय पशू प्रदर्शनात दोन टनांचा रेडा, साडेतीन फुटांचा कोंबडा हे वेगळे आकर्षणही असेल,’’ असेही राऊत म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics: 'कोल्हापूर'च्या राजकारणाला उकळी, 'गोकुळ'मधील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजकीय वाद चिघळला

Agrowon Podcast: कापूस,सोयाबीनला मागणी कायम; आवळ्याला उठाव, काकडी स्थिर तर बाजरी आवक कायम

Farm Road Scheme: शेतरस्ते योजनेत राजकीय कार्यकर्त्यांचीच वर्णी

Kharif Intercropping: खरीप हंगामात नाचणी पिकामुळे दिलासा

Women Empowerment: धाराशिवच्या महिलांची उद्योग क्षेत्रात गरुड झेप

SCROLL FOR NEXT