Cotton Seed  Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Seed Rate : ‘बीजी-२’ कापूस बियाणे पाकीट ८५३ रुपयांना

राज्याचे मुख्य पीक असलेल्या कापूस बियाणे दरात यंदा वाढ करण्यात आली आहे. गेल्या हंगामात बिजी-२ तंत्रज्ञान कापूस वाणाचे दर ८१० रुपये प्रतिपाकीट होते.

Team Agrowon

Cotton Market Update नागपूर : राज्याचे मुख्य पीक असलेल्या कापूस बियाणे दरात (Cotton Seed Rate) यंदा वाढ करण्यात आली आहे. गेल्या हंगामात बिजी-२ तंत्रज्ञान कापूस वाणाचे दर (Cotton Veriety) ८१० रुपये प्रतिपाकीट होते. यंदाच्या हंगामात त्यात ४३ रुपयांची वाढ करण्यात आली असून आता ८५३ रुपये दर राहणार आहे.

राज्यात कपाशी व सोयाबीन ही दोन मुख्य पिके आहेत. या दोन्ही पिकांचे सरासरी क्षेत्र प्रत्येकी ४० लाख हेक्टरच्या आसपास आहे. सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यास सोयाबीन लागवड क्षेत्रात वाढ होते.

अन्यथा कापूस दरात तेजी असल्यास शेतकरी कापसाला पसंती देतात, असा दरवर्षीचा अनुभव आहे. गेल्या हंगामात कापसाचे दर तेजीत असल्याने यंदा कापूस लागवड क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली. गेल्या हंगामात राज्यात ४३ लाख हेक्टरवर कापूस लागवड होती.

दरम्यान, ‘बीजी-एक’ हे तंत्रज्ञान आउटडेटेड झाल्याने शेतकऱ्यांकडून ‘बीजी-दोन’ या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेल्या कापूस वाणाची लागवड होते. त्याकरिता ४७५ ग्रॅम बियाणे असलेल्या दोन पाकिटांचा वापर एका एकरासाठी केला जातो. गेल्या हंगामात ‘बीजी-२’ कापूस वाणासाठी शेतकऱ्यांना प्रतिपाकीट ८१० रुपये इतका खर्च करावा लागत होता.

राजपत्र प्रकाशित

यंदा केंद्र सरकारने बीजी-२ तंत्रज्ञान असलेल्या कापूस वाणाची किंमत ८५३ रुपये इतकी निश्चित केली आहे. त्यासंबंधीचे राजपत्र शुक्रवारी (ता.२३) प्रकाशित करण्यात आले.

गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा प्रतिपाकीट ४३ रुपये इतकी वाढ केली आहे. गेल्या हंगामात कापसाचे दर १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत होते. त्यामुळेच बियाणे दरात वाढ झाल्याचे सांगितले जाते.

एकरी दोन पाकिटांची गरज भासते. पाच ते सात क्विंटल उत्पादकता मिळते. तंत्रज्ञानातून उत्पादकता वाढ होत असेल तर शेतकरी अधिक किंमत चुकविण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे ‘बीजी-२’ नंतर उपलब्ध असलेले तंत्रज्ञान मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याकरिता केंद्र शासनाने पुढाकार घेतला पाहिजे.
- गणेश नानोटे, कापूस उत्पादक शेतकरी, निंभारा, अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT