Bear Protecting Crops
Bear Protecting Crops Agrowon
ताज्या बातम्या

Crop Protect By Bear : चक्क अस्वलंच करतंय शेतातल्या पिकांची राखण

Team Agrowon

Farmers Dressed As a Bear : वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात आल्यामुळे बऱ्याचदा वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे आपला मोर्चा वळवतात. अन्नाच्या शोधात फिरत वन्यप्राणी शेतातील उभ्या पिकांची नासाडी करतात.

रानडुकरे, जंगली माकडे यासारख्ये प्राणी शेती पिकांची मोठ्या प्रमाणात नासधुस करतात. जंगली प्राण्यांपासून पीकं वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसरात्र शेतात खडा पहारा द्यावा लागतो.

कधीकधी तर रात्र शेतातील मचाणीवर जागून पिकांचे रक्षण करावे लागते. अशावेळी वन्य प्राण्यांकडून हल्ला होण्याची शेतकऱ्यांना भीतही असते. मात्र, जंगली माकडांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील एका शेतकऱ्याने नामी शक्कल लढवली आहे.

शेतातील उभ्या पिकांचे माकडांपासून संरक्षण करण्यासाठी हा शेतकरी चक्क अस्वल बनून शेतात पहारा देत आहे. अस्वलाच्या वेशात शेतात फिरणाऱ्या या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील शेतकऱ्याने माकडांपासून शेतातील पीक वाचविण्यासाठी अस्वलाचा वेश धारण केला आहे. अस्वलाचा वेश परिधान करून हा शेतकरी आपल्या शेताची रखवाली करत आहे.

ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा शेतकरी अस्वलाचा वेश करून शेतात फिरताना दिसत आहे. लखीमपूर खीरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये माकडांनी उच्छाद मांडला आहे. माकडांकडून शेती पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करण्यासह लोकांवर हल्लेही केले जात आहे. यामुळे या गावांमधील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

अस्वल बनून शेताची रखवाली

मैगलगंज येथील ढखौरा गावामध्ये माकडांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. माकडांपासून पिके वाचविण्यासाठी रामनिवास या शेतकऱ्याने अस्वलाचे रूप धारण केले आहे. हा शेतकरी अस्वलाचा ड्रेस घालून आपल्या शेतात जातो आणि पिकांचे नुकसान करणाऱ्या माकडांना हाकलून लावत आहे.

ढखौरा गावासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये माकडांच्या दहशतीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. माकडांकडून ऊस, भाजीपाला, भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे.

अस्वल पाहून लोकही घाबरतात

शेतात अस्वलाच्या वेशात फिरणाऱ्या शेतकऱ्यांना पाहून माकडे पळून जातात. शेतकरी पाळी-पाळीने शेतात अस्वल बनून रखवाली करतात. ज्याला पाहून माकडे घारतात आणि पळून जातात. याशिवाय बाहेर गावांवरून येणारे लोकही शेतात फिरणारे अस्वल पाहून घाबरतात.

तेलंगाणातील शेतकऱ्यानेही केला होता प्रयोग

तेलंगणा राज्यातील सिद्दीपेट येथील एका शेतकऱ्यानेही असाच प्रयोग आपल्या शेतात केला होता. जंगली जनावरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी या शेतकऱ्याने चक्क एका माणसालाच अस्वलच ड्रेस घालून कामाला ठेवले होते.

भास्कर रेड्डी या शेतकऱ्याने शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी त्यावेळी एक अनोखी युक्ती केली होती. हा शेतकरी रोजंदारीवर ठेवलेल्या अस्वलाकडून आपल्या शेताची रखवाली करून घेत होता. यासाठी हा शेतकरी अस्वल झालेल्या माणसाला दिवसाला पाचशे रुपये पगारही द्यायचा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

SCROLL FOR NEXT