Agriculture News Baramati Agrowon
ताज्या बातम्या

Galyukt Shiwar Yojana : नापीक शेती, माळरान होणार बागायती

Maharashtra Government Scheme : जिल्ह्यात मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना इंधन व यंत्रसामुग्रीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.

Team Agrowon

Baramati Agriculture News : जिल्ह्यात मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना इंधन व यंत्रसामुग्रीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.

त्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता वाढून नापिक व माळरान शेती, बागायती होण्यास मदत होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना या अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे

अभियानाअंतर्गत धरण किंवा तलावातील गाळ उपसून शेतात पसरविल्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच धरण किंवा तलावाची मूळ पाण्याची साठवण क्षमता वाढण्यास मदत व्हावी, हा या योजनेचा मूळ उद्देश आहे.

त्यानुसार मृद व जलसंधारण विभागाकडून जिल्ह्यातील या अभियानाअंतर्गत गाळ उपसा करण्यासाठी इंधन व यंत्रसामग्रीसाठी प्रती घनमीटर ३१ रुपये खर्च शासनाकडून देण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी संबंधित गावच्या ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. या योजनेअंतर्गत विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकरी, अंत्य अल्पभूधारक यांच्यासाठी (१ हेक्टरपर्यंत) व लहान (१ ते २ हेक्टर) शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रुपये याप्रमाणे व अडीच एकर क्षेत्रासाठी ३७ हजार ५०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी अशासकीय संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. धरण व तलावातील गाळ काढल्यानंतर जल साठा वाढून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल. तसेच नापिक जमिनी सुपीक होण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्ह्यातील अशासकीय संस्थानी जिल्हा मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यालयाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावेत.

-सुजाता हांडे, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी

आमच्या शिवारातील गोंडगे पाझर तलावात गाळ साचला आहे. आम्हाला आमच्या शेतात गाळ टाकायचा आहे. त्यामुळे आम्ही या कामासाठी गेल्या काही दिवसांपासून या योजनेची वाट पाहत होतो. गाळ काढून शेतात भरण्यासाठी योजना आल्यामुळे पिके फुलविण्यास फायदा होणार आहे.

-विशाल गोंडगे, शेतकरी, सोनवडी सुपे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme: जुनी विहीर दुरुस्तीसाठी १ लाखांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

Farmer loan Waiver: कर्जमाफीसाठी मुंबई एकदिवस बंद करा; बच्चू कडू यांची राज ठाकरेंकडे मागणी 

Forest Encroachment: वनजमिनीवर अतिक्रमणकर्त्यांवर फौजदारी

Ambajogai KVK: अंबाजोगाई केव्हीकेमध्ये ‘किसान गोष्टी’

Kharif 2025: मराठवाड्यात ४८ लाख हेक्टरवर खरीप पेरा 

SCROLL FOR NEXT