Banana Growers Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : गारपिटीच्या भरपाईपासून केळी उत्पादक वंचित

गेल्या वर्षात गारपिटीमुळे केळी उत्पादकांचे नुकसान झाले होते. अकोट तालुक्‍यात पणज भागातील शेतकऱ्यांनी विमा काढलेला असतानाही शंभरावर शेतकऱ्यांना अद्यापही पीकविम्याची मदत मिळालेली नाही.

टीम ॲग्रोवन

अकोला ः गेल्या वर्षात गारपिटीमुळे केळी उत्पादकांचे नुकसान (Banana Crop Damage) झाले होते. अकोट तालुक्‍यात पणज भागातील शेतकऱ्यांनी विमा (Crop Insurance) काढलेला असतानाही शंभरावर शेतकऱ्यांना अद्यापही पीकविम्याची मदत मिळालेली नाही. काही शेतकऱ्यांनाच ही मदत (Crop Damage Compensation) मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांना केव्हा मिळेल असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे. लाभ न मिळालेल्या केळी उत्पादकांनी अकोट तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे यांना निवेदनही दिले.

शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे, की गेल्या २०२१-२२ वर्षात शेतकऱ्यांनी तत्कालीन एचडीएफसी कंपनीकडे विमा काढला होता. गारपीट झाल्यानंतर विमा कंपनीला तेव्हा ई-मेलही केले. त्या गारपीट आपत्तीचा काही शेतकऱ्यांना विमा कंपनीने लाभही दिला. परंतु बरेच शेतकरी वंचित ठेवले. काहींना मदत व काहींना वगळल्याने काहीतरी गौडबंगाल तर झालेले नाही ना अशी शंका शेतकऱ्यांनी निवेदनात व्यक्त केली.

शेतकरी याबाबत कृषी अधिकाऱ्यांना वारंवार विचारत आहेत. मात्र, त्यांच्याकडून आता टाळाटाळ केली जाते. विमा कंपनीकडूनही समाधानकारक उत्तर दिले जात नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

गजानन आकोटकर, पंजाबराव बोचे, उत्तमराव आकोटकर, चंद्रकला आकोटकर, पुष्पा चंद्रशेखर झापे, अरुण भांडे, मुकिंदा आकोटकर, पदमा आकोटकर, संध्या बोचे, मनोहर आवंडकर, महादेव आकोटकर, उत्तमराव आकोटकर, देविदास महल्ले, नितीन महल्ले, नीलेश शेंडे, पुरुषोत्तम महल्ले, विलास महल्ले, अनिल महल्ले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT