Mobile Addiction  Agrowon
ताज्या बातम्या

Mobile Addiction : किशोरवयीन मुलांना मोबाईल वापराची बंदी

ग्राम विकासासोबतच समाज तंदुरुस्त राहण्यासाठी काही ग्रामपंचायती ग्रामसभेत आगळेवेगळे ठराव घेत अंमलबजावणी करतात.

Team Agrowon

पुसद, जि. यवतमाळ : ग्राम विकासासोबतच समाज तंदुरुस्त राहण्यासाठी काही ग्रामपंचायती (Gram Panchayat) ग्रामसभेत आगळेवेगळे ठराव घेत अंमलबजावणी करतात. पुसद तालुक्यातील बांशी ग्रामसभेने असाच एक वेगळा प्रयोग केला आहे. किशोरावस्थेतील नवीन पिढी मोबाईलच्या (Mobile) आहारी गेली आहे. त्याचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी बांशी ग्रामसभेत १८ वर्षांखालील मुला-मुलींना मोबाईल वापरण्याची बंदी घातली आहे.

पुसद तालुक्यातील साग जंगलाला लागून असलेल्या बांशी गावात शुक्रवारी (ता.११) ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये १८ वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याशिवाय शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकांसाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना लागू करणे, तसेच निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. हे तीनही ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेने घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या गहुली गावाला बांशी, चोंढी या गावावरून जावे लागते. एकेकाळी गहूली आदर्श ग्राम होते. नंतर चोंढीनेही ग्रामविकास पुरस्कार मिळवला. आता बांशीने मोबाईल बंदीचा आगळावेगळा निर्णय घेऊन तरुणाईला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणासाठी किशोरवयीन मुलांच्या हाती मोबाईल आले खरे, मात्र त्याचा फायदा होण्याऐवजी बरेचदा वाईट परिणाम दिसून आले. मात्र आता मुलांच्या हाती कोणीही पालक मोबाईल देणार नाही. या ठरावाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले आहे.

या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गजानन टाले होते. उपसरपंच रेखा राठोड, सचिव पी. आर. आडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष आगलावे, अभय ढोणे, माधव डोंगरे, इंदू तांबारे, शोभा आगलावे, मंगल शर्मा, सुनीता लथाड, पंकज बुरकुले, मुख्याध्यापक यशवंत देशमुख आदी उपस्थित होते.

गावातील शाळकरी मुलांना मोबाईलचे व्यसन जडले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मोबाईल बंदीचा निर्णय घेतला आहे. अंमलबजावणी करताना अडचणी येतील. मात्र समुपदेशनातून या अडचणी दूर करू. प्रसंगी दंड व टॅक्स लावावा लागेल. परंतु ग्रामस्थांचा या निर्णयाला एकमुखी पाठिंबा आहे.

- गजानन टाले, सरपंच, बांशी, ता. पुसद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Argentina Agriculture : भारत आणि अर्जेंटिनामध्ये करार; तेलबिया, कडधान्यासाठी दोन्ही देश संयुक्त संशोधन करणार

Pradnya Satav Resigns: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश

Maize Procurement: कन्नड तालुक्यात ६६१ नोंदण्या झाल्या पूर्ण

Police Patil Bharati: बीड जिल्ह्यातील पोलिस पाटील भरतीमधील बिंदूनामावलीचा अडसर दूर

Vertical Farming : शहरी भागातील उभ्या शेतीला जपानच्या तंत्रज्ञानाची साथ?

SCROLL FOR NEXT