Mobile Invitation : निमंत्रण पाठवा मोबाईलवरच

लग्न ठरले की लग्नाच्या निमंत्रण पत्रिका हा वर आणि वधूच्या वडिलांसाठी सगळ्यात तापदायक विषय असतो.
Mobile Invitation
Mobile Invitation

- शंकर बहिरट

लग्न ठरले की लग्नाच्या निमंत्रण पत्रिका (Invitation) हा वर आणि वधूच्या वडिलांसाठी सगळ्यात तापदायक विषय असतो. लग्न पत्रिकेचे स्वरूप कसे असावे, पत्रिकेत कुणाची नावे असावीत यावरून अनेक चर्चा होतात. पत्रिका छापून झाल्यावरही रुसवे फुगवे होतात. निमंत्रण पत्रिकेत विनाकारण अनेक लोकांची नावे लिहिण्याची आवश्यकता नसते.

Mobile Invitation
शंकर कारखानाही एफआरपीप्रमाणे बिल देणार ः मोहिते पाटील

खरे तर लग्न कार्यात आर्थिक मदत करणारे, हाकेला ओ देऊन कुठल्याही क्षणी धावून येणारे जवळचे नातेवाईक आणि जिवलग मित्र हे सर्वांत महत्त्वाचे असतात. पत्रिकेच्या माध्यमातून अशा लोकांची प्रामुख्याने समाजाला ओळख होणे गरजेचे असते. सर्व नातेवाइकांना आणि पंचक्रोशीतल्या बहुतेकांना किमान हजार ते तीन हजार लोकांना त्या पत्रिका घरी जाऊन द्याव्या लागतात. हे वेळखाऊ आणि खर्चीक काम असते.

साधारण दहा-पंधरा दिवस निमंत्रण पत्रिका वाटणे हे लग्न कार्यातले सर्वांत मोठे काम असते. प्रत्येक घरी चहाचा आग्रह होतो. हमखास तब्येत बिघडते. या धावपळीत बहुतेक वेळा अपघातही होतात. अनेक कुटुंबात धावपळ करणारा एखादाच कर्ता पुरुष असतो. निमंत्रण पत्रिका वाटण्याच्या दगदगीत तो आजारी पडला, तर मुख्य लग्नसमारंभात त्याला आणखी त्रास होतो. कोरोना पश्‍चात एक महत्त्वाचा सकारात्मक बदल झाला आहे. तो म्हणजे सध्या तरी व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून छोटीशी निमंत्रण पत्रिका पाठवली जाते, फोनवरूनही कळवले जाते.

Mobile Invitation
Sugar Export : साखर निर्यात कोट्यात महाराष्ट्रावर अन्याय

सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात निरोप पाठवण्यासाठी व्हॉट्‍सॲपसारख्या माध्यमाचा प्रभावी वापर होतो. पत्ता बदलल्यामुळे किंवा बाहेरगावी गेल्यामुळे निमंत्रण पत्रिका पोहोचत नाहीत, गहाळ होतात. सोशल मीडियावर पाठवलेली निमंत्रण पत्रिका क्षणार्धात पोहोचते. समोरच्या व्यक्तीने स्वीकारल्याचे आणि पत्रिका वाचल्याचे आपल्याला समजते. गुगल मॅपवर लग्नाच्या ठिकाणाची लिंक पाठवली, तर लग्न कार्यालय शोधणे अगदी सोपे होते.

खिशात मावणार नाहीत इतक्या मोठ्या आणि महागड्या छापील पत्रिकाजवळ बाळगणे अवघड असते. मोबाईल मात्र प्रत्येकाच्या खिशात असतो. सुखदुःखाच्या क्षणी आपल्या जवळच्या माणसांसोबत असणे हे माणुसकीचे लक्षण आहे.

निरोप कोणताही असो मंगल कार्याचा किंवा दुःखद घटनेचा तो मिळायला अवकाश आपण तिथे असायला हवे असे वाटणे म्हणजे जिव्हाळा किंवा आपुलकी असते. स्नेह वृद्धिंगत होणे ज्याला महत्त्वाचे वाटते तो निरोपाचे माध्यम काय आहे ते बघत नाही. आधुनिक काळात छापील पत्रिका टाळून सोशल मीडियाच्या माध्यमातून निमंत्रण पत्रिका स्वीकारण्यासाठी सर्वांनी आग्रह धरायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com