Bailpola Celebration Agrowon
ताज्या बातम्या

Bailpola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बैलपोळा साजरा

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्र प्रक्षेत्रावर संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उत्सव झाला.

टीम ॲग्रोवन

अकोला ः येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा (Bailpola Celebration) करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले (Dr. Vikas Bhale) यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्र प्रक्षेत्रावर संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उत्सव झाला.

या प्रसंगी विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शेषराव चव्हाण, मध्यवर्ती संशोधन केंद्राचे संचालक डॉ. हरमनसिंग सेठी, डॉ. गोविंद जाधव, डॉ. एस. एस. तायडे, उपकुलसचिव राजीव कटारे, डॉ. सतीश ठाकरे, डॉ. जयंत देशमुख, कुलगुरू कार्यालयाचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, तांत्रिक अधिकारी डॉ. नीरज सातपुते, सुहास कोळेश्वर, विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांच्यासह सर्व प्रक्षेत्र प्रभारी, अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.

डॉ. खर्चे, कुलसचिव डॉ. काळबांडे, डॉ. वडतकर, डॉ. चव्हाण, श्री. कटारे यांच्या हस्ते बैलांची पूजा करण्यात आली. ठोंबरा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. याप्रसंगी पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे डॉ. राजेश्वर शेळके, डॉ. किशोर बिडवे, डॉ. संजय शेगोकार, डॉ. संजीव नागे, डॉ. प्रकाश कहाते, राजेश ढगे, रवि पवार, शशिकांत गोटे, सतीश मुन्नरवार, जगदीश राठोड, गिरीश बानोकार आदी उपस्थित होते.

सेंद्रिय शेती संशोधन केंद्रावरही पूजन

विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या प्रक्षेत्रावर सुद्धा विभाग प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैलांची पूजा करण्यात आली. याप्रसंगी उद्यानविद्या विभागातील फुलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन गुप्ता, कृषी विद्या विभागाचे डॉ. जयंत देशमुख, डॉ. नितीन पत्की, डॉ. नितीन राऊत, डॉ.मिलिंद गिरी, डॉ. इसाळ यांच्यासह शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT