Cotton Seed Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Seed : कपाशी बियाण्याचे एकरासाठी पाकीट हवे

कपाशी उत्पादक कंपन्यांकडून पाकिटात साडेचारशे ग्रॅम बियाणे दिले जाते. त्यामुळे पॅकिंगचा खर्च वाढतो आणि शेतकऱ्यांनाही किंमत द्यावी लागते.

टीम ॲग्रोवन

अकोला  : कपाशी उत्पादक कंपन्यांकडून (Cotton Seed) पाकिटात साडेचारशे ग्रॅम बियाणे दिले जाते. त्यामुळे पॅकिंगचा खर्च (Seed Packaging Cost) वाढतो आणि शेतकऱ्यांनाही किंमत द्यावी लागते. परिणामी एक एकरासाठी कापूस बियाणे पॅकिंग असावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषी उपसंचालकांकडे केली.

बाळापूर तालुक्यातील मालवाडा येथे ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमाअंतर्गत कृषी उपसंचालक पांडुरंग शिगेदार यांनी भेट दिली. प्रयोगशील शेतकरी दिलीप ठाकरे, बाळापूर तालुका कृषी अधिकारी एन. डी. माने, मंडळ कृषी अधिकारी एस.डी. जाधव, कृषी सहाय्यक व्ही. आर. वसतकर उपस्थित होते.

पीकविमा कंपनीकडून मंडळनिहाय पावसाची नोंद घेतली जाते. त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. पावसामुळे नुकसान झाल्यानंतर त्यांना भरपाई पासून वंचित राहावे लागते. रेन गेजची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तर दिलीप ठाकरे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात कापसातील अनावश्यक कचरा कसा कमी करावा याकडे लक्ष द्यावे.

अनावश्यक घटक कापसात गेल्यास प्रक्रियेत अडचणी येतात. त्यामुळे वेचणी करताना दक्षता बाळगावी.’’ कार्यक्रमाला मुरलीधर टाले, विजय पाटील, नासिर खान, दिलीप डोंगरे, विलास जाधव, बंडूभाऊ गावंडे, विनायक वैराळे, राहत भाई, प्रकाश पारसकर, ज्ञानदेव रोहणकार, बंडूभाऊ भगत, गोपाल कराले, प्रवीण बोळे, कलीम भाई आदी शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT