Orange Orchard Agrowon
ताज्या बातम्या

Orange Cultivation : संत्रा लागवड करताना अंतर, दिशा, कलमांबाबत जागरूकता हवी

Orange Farming : नवीन संत्रा बागेची लागवड करताना दोन झाडांतील अंतर हे सहा बाय सहा मीटर किंवा सहा बाय तीन मीटर हेच ठेवावे. याव्यतिरिक्त इतर कुठल्याही अंतरावर लागवड करू नये.

Team Agrowon

Washim News : नवीन संत्रा बागेची लागवड करताना दोन झाडांतील अंतर हे सहा बाय सहा मीटर किंवा सहा बाय तीन मीटर हेच ठेवावे. याव्यतिरिक्त इतर कुठल्याही अंतरावर लागवड करू नये. सहा बाय तीन लागवड केल्यास सहा मीटर हे अंतर पूर्व-पश्चिम असणे गरजेचे असते.

तसेच कलमांची निवड करताना कलम ही खात्रीशीर रोपवाटिकेमधूनच घ्यावीत. शक्यतोवर पिशवीमधील जास्तीत जास्त दोन ते अडीच फूट उंचीची व परिपक्व कलमे निवडावीत, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी दिला.

जिल्ह्यात संत्रा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मृग बहराचे उत्पादन घेतात. या मध्ये त्यांना विविध तांत्रिक समस्याना सामोरे जावे लागते. यासाठी फूल धारणेपासून ते काढणीपर्यंत आधुनिक तंत्र अवगत करून उत्पादनवृद्धी व्हावी यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विज्ञान केंद्रातर्फे संत्रा पिकावर पहिली शेतीशाळा मानोरा तालुक्यातील धानोरा येथे झाली.

या वेळी श्री. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी आदर्श शेतकरी देविदास म्हातारमारे होते. तालुका तंत्र अधिकारी रामेश्वर पाटील, सांगवी केव्हीकेचे उद्यानविद्या तज्ज्ञ मयूर इंगोले, प्रगतिशील संत्रा शेतकरी प्रवीण ठाकरे, हिम्मतराव म्हातारमारे, गणेश ठाकरे, संतोष म्हातारमारे, सतीश म्हातारमारे, दिलीप राऊत, निखिल मिसाळ, प्रदीप मिसाळ, गजानन कोल्हे, संजय मिसाळ, उगरेश्वर राठोड, रायसिंघ राठोड, विष्णू पवार, रवींद्र म्हातारमारे तसेच धानोरा, चिखली, सोयजणा, साखरडोह आदी गावांतील संत्रा उत्पादक उपस्थित होते.

शेती शाळेच्या पहिल्या सत्रात निवडक शेतकऱ्यांच्या शेतात पिकाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तांत्रिक सत्रात श्री. पाटील, रामेश्वर पाटील यांनी मार्गदर्शन केले. म्हातारमारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रभाकर भोयर यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Konkan crop advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT