Rain Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : दहा दिवसात सरासरी ११३ मिलिमीटर पाऊस

Latest Rain Update : मागील १० दिवसात तब्बल ११३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर सप्टेंबरच्या प्रारंभालाच पावसाने हजेरी लावली. मागील १० दिवसात तब्बल ११३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ७७८.५० मिलिमीटरानुसार ८७.३४ टक्के पाऊस झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात जूननंतर जुले महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरिपातील पेरण्या आटोपल्या खऱ्या, परंतु त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. परिणामी अनेक भागात पीके वाळू लागली होती. यानंतर मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. हा पाऊस एक तारखेपासून सलग दहा तारखेपर्यंत झाला.

या काळात काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे सोयाबीन पिकांना उभारी मिळाला आहे. ता. सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधीत सरासरी ११३ मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यात वार्षिक पावसाची सरासरी ७७८.५० मिलिमीटरानुसार ८७.३७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीत सरासरी ८९१.३० मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु यंदा जूनमध्ये पावसाने दडी मारली. या महिन्यात केवळ सहा दिवसच पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिपातील पेरण्या लांबल्या होत्या. यानंतर मात्र जुले महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने सुरुवात केल्याने पेरण्यांना सुरुवात झाली. यानंतर मात्र पावसाचा जोर वाढत गेला. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. यामुळे जुलैमध्ये तब्बल २६ दिवस पावसाचे नोंदले गेले. यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचे केवळ नऊ दिवस गणले गेले. यानंतर सप्टेंबरच्या प्रारंभापासून मात्र पावसाने आश्‍वासक सुरुवात केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Sowing : खानदेशात हरभरा पेरा स्थिर राहण्याचे संकेत

BBF Technology : बीबीएफ तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. मायी

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

SCROLL FOR NEXT