Nashik DCC Bank Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Land Auction : जिल्हा बँकेने पुकारलेला शेतजमिनीचा लिलाव बंद पाडला

Nashik Agriculture News : ३ ऑगस्टला शेतकरी जयराम सुखदेव मोरे यांचा शेतीचा लिलाव जिल्हा बँकेने केला होता.

Team Agrowon

Nashik News : निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील विकास सोसायटीच्या कार्यालयात सोमवारी (ता. ७) जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी सूर्यभान मोरे, राजेंद्र मोरे, संजय मोरे, वसंत आहेर यांच्या शेतीचा लिलाव नाशिक जिल्हा बँकेचे अधिकारी करीत असताना, शेतकरी संघर्ष संघटनेने तीव्र विरोध करून लिलाव हाणून पाडला.

दरम्यान, ३ ऑगस्टला शेतकरी जयराम सुखदेव मोरे यांचा शेतीचा लिलाव जिल्हा बँकेने केला होता. सोमवारी (ता. ७) सोसायटीत तलाठी, महसूल अधिकारी, बँकेचे अधिकारी, ग्रामसेवक शेतीचा लिलाव करीत होते. त्यामुळे थकबाकीदार शेतकरी संतप्त झाले. शेतकरी संघर्ष संघटनेचे सर्व नेते व शेतकऱ्यांनी लिलाव हाणून पाडला.

जिल्हा बँकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकरी नेते धनंजय पाटील काकडे, शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, शेतकरी संघर्ष संघटनेचे सुधाकर मोगल यांनी उपस्थित थकबाकीदार शेतकऱ्यांना शेतकरीविरोधी कायदे व लिलाव होणाऱ्या शेतीचे कायदे, इतर माहिती व शेतकऱ्यांसाठी संघर्ष करण्याची भूमिका या वेळी समजावून सांगितली.

शेजमीन लिलावाविरोधात गावातील सर्व शेतकरी एकवटल्याचे चित्र दिसून आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे-पाटील, अक्षय मोरे, उमेश मोरे, सुरेश मोरे, पुंडलिक आव्हाड, भाऊसाहेब तासकर, रामदास आहेर, राजेंद्र मोरे, अण्णासाहेब मोरे, संजय मोरे, गिरीश जाधव, अनिल मोरे, शंकर भडांगे, प्रकाश कराटे, शांताराम मोरे, शिवाजी मोरे, सागर मोरे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरीही लिलाव सुरूच

४ ऑगस्ट रोजी मुंबई येथे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ नरहरी यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सक्तीने चालू केलेल्या वसुलीबाबत चर्चा केली. जिल्हा बँक प्रशासकाशी फोनवर चर्चा केल्याप्रमाणे जाहीर लिलाव प्रक्रिया थांबविण्यात यावी, असे सांगण्यात आले.

मात्र तरीही बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करणे चालू आहे. हे अत्यंत खेदजनक आहे, याबाबत निवेदन जिल्हा बँकेच्या प्रशासकांना देण्यात आले होते; मात्र तरीही लिलाव सुरूच असल्याने शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला.

एका बाजूला निसर्गाचा लहरीपणा, तर दुसऱ्या बाजूला शासनाचे शेतकऱ्यांकडे होणारे दुर्लक्ष त्यातच जिल्हा बँकेकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक बनली आहे. जिल्हा बँकेने या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.
- सूर्यभान मोरे, थकबाकीदार शेतकरी, शिरसगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Agriculture University Promotion : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीचे आदेश न काढणे कायदेशीर : आनंदकर

Agriculture University Rating : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन

Agriculture Department : ‘महसूल’ पाठोपाठ यंत्रणा असलेला कृषी विभाग विस्कळित

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

SCROLL FOR NEXT