Abdul Sattar Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Krishi Exhibition : आकर्षक शेतीमाल पॅकिंग, प्रक्रियायुक्त उत्पादनांनी वेधले लक्ष

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडल्याचे स्थिती आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना शेतकरी संघर्ष करत आहे; मात्र शेतीमालाची विक्री करताना नव्या संधी ओळखून मार्केटिंग करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Calamity) शेतकरी संकटात सापडल्याचे स्थिती आहे. अपेक्षित उत्पन्न (Income) मिळत नसताना शेतकरी संघर्ष करत आहे; मात्र शेतीमालाची विक्री करताना नव्या संधी ओळखून मार्केटिंग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक येथे झालेल्या कृषी महोत्सवात (Krishi Exhibition) शेतकऱ्यांनी उत्पादनांचे आकर्षक ब्रँडिंग व प्रक्रियायुक्त उत्पादनांची मांडणी करून ग्राहकांचे लक्ष वेधले. समारोपप्रसंगी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट देत शेतकऱ्यांच्या विक्री कौशल्याचे कौतुक करत दाद दिली.

पाच दिवसीय प्रदर्शनात १.५ लाखांवर शेतकरी व ग्राहक यांनी भेट दिली. सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत ग्राहकांची गर्दी दिसून आली. या प्रदर्शनाला जिल्हाभरातून शेतकऱ्यांनी भेटी देत तंत्रज्ञानाची पाहणी करत नवीन संकल्पना अवगत केल्या. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला थेट विक्री या ठिकाणी व्यासपीठ मिळाले नाशिकसह परिसरातून आलेल्या शेतकऱ्यांनी ग्राहकांकडून ग्राहकांनी शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदीला पसंती दिल्याचे दिसून आले.

२०२३ आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष असल्याने याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना व्यावसायिक पद्धतीने व्यासपीठ मिळवून दिल्याने ५ कोटींवर उलाढाल झाली. आयोजनाचे प्रयत्न यशस्वी झाले.

- मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT