Pomegranate  Agrowon
ताज्या बातम्या

Pomegranate : नुकसानग्रस्त डाळिंब उत्पादकांना मदत द्यावी

डाळिंबावरील मोठ्या प्रमाणात खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याने सोलापूरसह महाराष्ट्रातील अधिक प्रमाणात उत्पादित होणाऱ्या हजारो हेक्टर डाळिंब पिकाचे नुकसान झाले.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः डाळिंबावरील (Pest On Pomegranate) मोठ्या प्रमाणात खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याने सोलापूरसह महाराष्ट्रातील अधिक प्रमाणात उत्पादित (Pomegranate Production) होणाऱ्या हजारो हेक्टर डाळिंब पिकाचे नुकसान (Pomegranate Damage) झाले. त्यावर केंद्रीय कृषिमंत्री यांनी नेमलेल्या समितीवर लवकर निर्णय घेऊन अधिकाधिक मदत जाहीर करण्याची मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी संसदेच्या अधिवेशनात केली.

सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात डाळिंबावर शॉट होल बोररमुळे किडीच्या प्रादुर्भावामुळे हजारो हेक्टर डाळिंबाचे नुकसान झाले. सुमारे ७० हजार हेक्‍टर डाळिंबाच्या पिकांना किडीचा प्रादुर्भाव झाला आहे, असे या आधीच खा. डॉ. विकास महात्मे, कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

या प्रभावित, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी फेब्रुवारीमध्ये तातडीने समितीही स्थापन केली. या समितीने सोलापूर जिल्ह्याचा डाळिंबाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सोलापूरच्या डाळिंब शेतीला प्रत्यक्ष भेट दिली. या परिस्थितीचा सविस्तर अहवाल संशोधन केंद्राच्या फलोत्पादन विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पण पुढे काहीच झालेले नाही. यामध्ये सध्या डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा व मदत मिळण्यासाठी स्थापन समितीच्या अहवालानुसार योग्य ती कार्यवाही करून मदत जाहीर करण्यात यावी, असेही खासदार डॉ. महास्वामींनी या वेळी बोलताना सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT