Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : आष्टी परिसराला अतिवृष्टीचा तडाखा

अनेक घरांत शिरले पाणी, महादेव मंदिर पाण्याखाली

टीम ॲग्रोवन

आष्टी, जि. बीड : आष्टी शहर व परिसरात गुरुवारी सकाळी झालेल्या अतिवृष्टीने (Heavy Rain) शहर परिसराला मोठा तडाखा बसला. विशेष करून आष्टी शहर व तालुक्यातील पांढरी परिसरात या पावसाचा जोर अधिक होता. यामुळे करंजीच्या ओव्हर फ्लो झालेल्या तळ्याच्या सांडव्यातून पाणी वाहू लागले.

शहरातील पिंपळेश्‍वर महादेवाचे मंदिर शेजारील तळ्याला आलेल्या पाण्यामुळे पाण्यात गेले आहे. अनेक घरांत पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे. शेतीचेही या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या आठवड्यापासून आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी सुरू आहे. गुरुवारी सकाळी सलग चौथ्या दिवशी आष्टी परिसरात पावसाने हजेरी लावली. सकाळी नऊ वाजता सुरू झालेला पाऊस दुपारी एक वाजेपर्यंत मुसळधार कोसळत होता.

या पावसाने आष्टी शहरातील भीमनगर तसेच दारूगल्ली या नदीकाठच्या भागासह इतरही अनेक भागांत पाणीच पाणी झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. शहराचे ग्रामदैवत पिंपळेश्‍वर महादेव मंदिराचे तळे यापूर्वीच भरलेले होते.

आजच्या पावसाने तळ्याचे पाणी मंदिराला टेकून मंदिर पाण्यात गेले. आष्टीपासून ५ किलोमीटरवर असलेल्या तालुक्यातील पांढरी परिसराला या पावसाचा जोरदार तडाखा बसला. शेतांमध्ये पाणी साचल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.

तसेच काढणी करून ठेवलेल्या पिकालाही अनेक ठिकाणी फटका सोसावा लागला आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पडत आहे. दुपारनंतर पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT